वीरशैव तेली समाज लातूर यांच्यातर्फे नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशनाचा शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर रोजी कार्यक्रम भालचंद्र ब्लड बँक येथील हॉलमध्ये पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री. उमाकांतआप्पा कोरे,( सचिव -वीरशैव समाज लातूर.) श्री. अशोकभाऊ भोसले (विश्वस्त-सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय लातूर ) श्री. बसवंत आप्पा भरडे (सचिव-श्री जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडल लातूर ) प्रमुख पाहुण्यांचे सत्कार जेष्ठ संचालकांतर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष किशोर भुजबळ यांनी केले त्यामध्ये समाजातर्फे राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी पाहुण्यांना माहिती देण्यात आली. यावर्षी महिलांतर्फे नवरात्रीमध्ये देवीला कुंकूमार्चम पूजा करण्यात आली तसेच दरवर्षी ही पूजा आम्हाला समाजातर्फे करू देण्यात यावी असे त्यांनी श्री.बसवंतप्पा भरडे यांना मागणी केली.
प्रमुख पाहुणे श्री. उमाकांत कोरे यांनी आपल्या समाजासाठी वीरशैव भवन हे सदैव उपलब्ध राहील असे सांगितले. श्री अशोक भाऊ भोसले यांनी गंगेच्या पाण्याचे अभिषेक साठी आपण जेवढ्या महिला घेऊन याल त्या सर्वांची व्यवस्था मंदिर समितीतर्फे करण्यात येईल असे सांगितले.श्री बसवंतप्पा भरडे यांनी समाजातर्फे दिलेली मागणी मान्य करत दरवर्षी नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला आपल्याला कुंकुमार्चन पूजा करण्यासाठी परवानगी दिली.
प्रकाशनाचा कार्यक्रम हा समाजातील दिनदर्शिके मध्ये जाहिरात दिलेल्या व्यवसाईक श्री. सतीश व्यवहारे,श्री. विजय फेसगाळे,श्री.आकाश निर्मळे,श्री. शिवकुमार क्षीरसागर,श्री. प्रशांत बेद्रे,श्री. प्रसाद होलखंबे.श्री. सिद्धेश्वर भांडेकरी,श्री. सोमनाथ भाग्यवंत ,श्री. सचिन लोखंडे,श्री. अमोल काळे,श्री.महेश काळे,श्री. राजेश काळे,सौ. सारिका क्षीरसागर,सौ. रेखा कलशेट्टी,श्रीमती.विमल देशमाने,श्री.शुभम भुजबळ जेष्ठ सल्लागार श्री. भिमाशंकर देशमाने ,श्री नागनाथ भुजबळ,श्री दत्तात्रय लोखंडे,श्री शिवाजी खडके यांच्या हस्ते पार पडला. हा कार्यक्रम वीरशैव तेली समाजातील पदाधिकारी अध्यक्ष- श्री किशोर भुजबळ, सचिव- श्री अजय कलशेट्टी,सह सचिव- श्री इंद्रजित राऊत,कोषाध्यक्ष- श्री सुदर्शन क्षीरसागर,संचालक- श्री राजेश्वर हरनाळे, श्री हनुमंत (मुन्ना)भुजबळ,श्री युवराज लोखंडे, व समाजातील युवा प्रमुख श्री बाळू चोपडे,श्री कृष्णाप्पा खडके,श्री. गणेश होकळे, श्री विशाल देशमाने श्री. गोपाळ विजय भुजबळ यांच्या उपस्थित पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. सतीश व्यवहारे यांनी केले.