शिर्डी ग्रामस्थ व शिर्डी शहर तेली समाजाचे वतीने श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी कार्यक्रम यानिमित्ताने श्री विठ्ठल मंदिर कनकुरी रोड शिर्डी येथे सकाळी १०:०० वाजता पुण्यतिथी निमित्ताने अभिषेक पूजा करण्यात आली यानंतर हभप उदय महाराज घोडके यांचे सुमधुर प्रवचन संपन्न झाले त्यानंतर शिर्डी शहरातील सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते महाआरती पुण्यतिथी दीप प्रज्वलन व महाआरती व तद्नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी वाघचौरे परिवार , लुटे परिवार, महाले परिवार , लोखंडे परिवार, चौधरी परिवार, मगर परिवार, धामणे परिवार, कोते परिवार, शेजवळ परिवार, जिभकाटे परिवार, व्यवहारे परिवार, कसबे परिवार,पन्हाळे परिवार, शिंदे परिवार, मोरे परिवार, जाधव परिवार, हजारे परिवार, क्षीरसागर परिवार, वेळांजकर परिवार, कवडे परिवार, धारक परिवार, उचित परिवार, पाडसवान परिवार, आहेर परिवार, दांगट परिवार,मेहर परिवार, कर्डीले परिवार, चोथे परिवार, राऊत परिवार, गाडेकर परिवार, केदार परिवार, भोलाने परिवार, कर्पे परिवार, मिसाळ परिवार, रोकडे परिवार, चोथवे परिवार, दानखांडे परिवार , वाघमारे परिवार, रत्नपारखी परिवार , सोनवणे परिवार , आदी सर्व परिवार व समस्त शिर्डी शहर तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते