शिरपुर : राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचे मजबूत सरकार आहे. त्यामुळे जिल्ह्यात राज्याच्या सरकारच्या वतीने काही कमी पडू देणार नाही. तर जिल्ह्यात आता पाचही आमदार एकाच विचाराचे असल्याने जिल्हा विकासाच्या मार्गाने घोडदौड करेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल यांनी व्यक्त केले, ते शिरपूर शहरात तेली समाजभवनाच्या भूमिपूजन व नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी शालेय शिक्षणमंत्री आ. अमरीशभाई पटेल, आ. काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. धरती देवरे, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, जिप उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, धुळ्याचे माजी महापौर सौ. जयश्री अहिरराव, जळगांव महिला तेली महासंघ जिल्र्हाध्यक्ष निर्मलाबाई चौधरी, जिल्हा परिषद सदस्य सौ. वैशाली चौधरी, चोपडा नपा गटनेते जीवन चौधरी, सेंधव्याचे माजी उपनगराध्यक्ष अशोक (छोटु) चौधरी, शिवनपा उपनगराध्यक्ष सौ. छाया ईशी, धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा चिटणीस हेमंत पाटील, तालुकाध्यक्ष किशोर माळी, बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी, शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख कन्हैया चौधरी आदी उपस्थित होते. शिरपूर शहरात तेली समाज भवनाचे भूमिपूजन व धुळे जिल्ह्यात निवडून आलेल्या भाजप व महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ना. जयकुमार रावल म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे केंद्रात सरकार आल्यानंतर प्रथमच ओबीसींचा विचार करण्यात आला आणि स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षात केंद्रात ओबीसींसाठी मंत्रालय स्थापन करण्यात आले. याच धरतीवर राज्यातही ओबीसी समाजासाठी मंत्रालय स्थापन करण्यात आले. असे ते म्हणाले. तर भाषणाच्या सुरुवातीला बोलताना मंत्री ना. जयकुमार रावल यांनी लाडक्या बहिणींमुळे भाजपचे सरकार आले हे आवर्जून उल्लेख केला आणि उपस्थित महिलांचा लाडक्या बहिणी म्हणून आभारही मानले. यावेळी आ. अमरीशभाई पटेल यांनीही मनोगत व्यक्त केले. आ. अमरीशभाई म्हणाले, माणूस स्वतःसाठी तर जगतोच मात्र समाजासाठीही जगणे महत्त्वाचे आहे. म्हणून थेट माणसाचा विकास होईल असे काम आपण करीत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये धुळे जिल्ह्यासाठी ना. जयकुमार रावल या तरुण नेतृत्वाला मंत्रिपदाची संधी दिल्यामुळे जिल्ह्यात निश्चितच सकारात्मक बदल होईल असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष व तेली समाज पंच मंडळ अध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन संदीप चौधरी तर आभार दुर्गेश चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिरपुर तेली समाज पंच मंडळ उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, सचिव जगदीश चौधरी, सहसचिव रमेश चौधरी, सदस्य सुरेश चौधरी श्यामकांत ईशी, संजय चौधरी, ईश्वर चौधरी, चंद्रवधन चौधरी, मोहन चौधरी, महेश चौधरी, नरेश चौधरी, युवराज चौधरी, दुर्गेश चौधरी, विजय चौधरी, जितेंद्र चौधरी, योगेश चौधरी, उत्तम चौधरी, विजय चौधरी, सुरेंद्र चौधरी, सुनिल चौधरी,श्री. संताजी मित्र परिवार, श्री. विघ्नहर्ता प्रतिष्ठान, श्री. संताजी मित्र मंडळ, श्री. खान्देश तेली समाज, तेली समाज महिला मंडळ यांनी घेतले.