तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने सर्व शाखीय तेली समाज मेळावा व भव्य उपवर उपवधू मेळावा समाज बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत थाटात संपन्न तेली युवक मंडळाचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत खणके यांनी सांगितले मागील 25 वर्षापासून या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे प्रेरणा 24 उपवर उपवधू या सूचिका पुस्तिकेत 325 मुला मुलींनी आपली नावे नोंदविली 103 मुला मुलींनी प्रत्यक्ष परिचय दिला या मेळाव्यात सर्व शाखीय तेली समाज हा वेगवेगळ्या शाखांमध्ये विखुरला न जाता एक संघ व्हावा आणि तेली समाजाचे संघटन मजबूत व्हावं या दृष्टीने हा प्रयत्न आहे तसेच भव्य उपवर उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्याचा उद्देश की समाजातल्या सर्व स्तरातील व सर्व शाखातील वधू-वरांना आपल्या पसंतीचा योग्य वर योग्य वधू मिळावी आणि कमी खर्चामध्ये वधू-वराचे शोधन पार पडावे या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते
मेळाव्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले नागपूर विभागाचे पदवीधर मतदार संघाचे आमदार माननीय एड अभिजीत वंजारी साहेब यांनी आपल्या भाषणामध्ये पूर्व विदर्भामध्ये तेली समाज हा मोठ्या संख्येने असतानाही राजकीय क्षेत्रामध्ये तेली समाजाला फारसं असं महत्व राजकीय पक्ष देत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली याकरिता समाजाला कुठेतरी संघटित होणे आणि आपली ताकद राजकीय पक्षांना दाखवून देणे गरजेचे आहे
मेळाव्याला उद्घाटक म्हणून लाभलेले मा. उमेश कोराम मुख्य संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच यांनी आपल्या उद्घाटनिय भाषणात सांगितले की प्रामुख्याने तेली समाजाचे असंख्य विद्यार्थी हे ओबीसी साठी निर्माण केलेल्या महाज्योती या शासकीय योजनेचा लाभ घेत नाही तेली समाजाच्या विद्यार्थ्यांनी महाज्योतीचा लाभ घ्यावा असे त्यांनी कळकळीने सांगितले
मेळाव्याला मुख्य अतिथी म्हणून श्री तुळशी दास पिपरे सरपंच ग्रामपंचायत इटोली श्री पलिंदर सातपुते सरपंच ग्रामपंचायत खरवस पेठ रवींद्र कामडी सरपंच ग्रामपंचायत कोसंबी सौ गोपिकाताई बुरांडे सरपंच ग्रामपंचायत गिलबिली सौ रोहिणी ताई राकेश नैताम सरपंच ग्रामपंचायत बोर्डा बोरकर सौ वर्षा हनुमान पिपरे सरपंच ग्रामपंचायत कासरगट्टा सौ चंदाताई कामडी संचालिका मूल बाजार समिती श्री घनश्याम जी येनुरकर संचालक बाजार समिती मुल सुनील कोहरे मानोरा श्री महादेव जी बुटले पळसगाव श्री संतोष इटणकर कोठारी श्री मोहन चलाख पोंभुर्णा श्री गणेश जी टिपले डोंगरगाव श्री नरेंद्र इटणकर विसापूर श्री मधुकर रागीट राजुरा श्री प्राचार्य राजेंद्र सावरकर मुल श्री रमेश जी गाटे भद्रावती श्री कवडीजी लोहकरे चिमूर श्री श्रावण जी खणके बाबूपेठ श्री डॉक्टर केशवराव शेंडे शिंदेवाई श्री कडूजी बुटले नवेगाव मार्गदर्शक श्री बबनराव फंड श्री तुळशीदासजी कुंडाळकर सावली श्री गंगाधर कुंडाळकर मुल श्री हरिदासजी नागपुरे चंद्रपूर श्री रमेश जी भुते चंद्रपूर श्री रवींद्र जुमडे चंद्रपूर एड रवींद्र खनके चंद्रपूर श्री शांताराम जी कांबडी श्री डॉक्टर महेश भांडेकर प्रा. डॉक्टर पांडुरंग मोहरकर प्रा डॉक्टर प्रगती नरखेडकर तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूरचे सर्व पदाधिकारी तेली समाजातील मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व गणमान्य समाजबांधव यांच्या उपस्थितीत स्नेहभोजनाने कार्यक्रमसंपन्न झाला.