वीरशैव तेली समाज लातूर,महिला मंडळ आयोजित मकर-संक्रांती निमित्त हळदी कुंकू समारंभ दिनांक 26 जानेवारी रोजी,वीरशैव सांस्कृतिक भवन लातूर येथे भव्य स्वरूपात पार पडला. याप्रसंगी हळदी कुंकू संमारंभाचे उद्घाटन डॉ. सौ. अर्चनताई पाटील चाकुरकर यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. उषा फेसगाळे, सौ. माया कलशेट्टी, सौ. मिनाक्षी राऊत, सौ. माहेश्वरी क्षीरसागर, सौ. शशीकला हारनाळे, सौ. मनीषा भुजबळ, सौ. प्राजक्ता लोखंडे, सौ. संगीता उदगिरे, सौ. महादेवी क्षीरसागर, ग्रीन लातूर वृक्ष प्रतिनिधि सौ. दिपाली राजपूत, सौ. आशा आयचीत हे उपस्थित होते.या सर्वांचे स्वागत हळदी कुंकू महिला समिती प्रमुख सौ.वनिता व्यवहारे व महिला समिति मेंबर यांनी केले. कार्यक्रमाची सुरवात कु. अंजली चोपडे व मंजिरी चोपडे यांच्या स्वागत गीताने व महात्मा बसवेश्वरच्या आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. या प्रसंगी ग्रीन लातूर वृक्ष टीम तर्फे सौ. दीपाली राजपूत यांनी वृक्ष लागवडीचे महत्व उपस्थित महिलांना सांगून ग्रीन लातूर वृक्ष टीम तर्फे सर्व महिलांना ५०० फुलांचे रोपटे वाण म्हणून देण्यात आले.
कार्यक्रम स्थळी सौ. प्रियंका देशमाने व सौ.विद्या टाकणे यानी देवीची मूर्ती तयार करून आकर्षक सजावट केली होती व सर्व महिलांचे प्रमुख आकर्षण केंद्र बनली होती. सुबक आणि सुंदर रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती त्यासाठी सौ.प्रियांका महेंद्रगीकर व कु. प्रज्ञा क्षीरसागर यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. पल्लवी व्यवहारे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व महिला मंडळा कडून अतिशय नियोजन बद्ध व काटेकोर पणे कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती त्यामध्ये प्रामुख्याने सौ.अश्विनी लोखंडे,सौ.सारिका क्षीरसागर,सौ. अनुसया देशमाने,सौ.वर्षा चोपडे,सौ.सोनाली होकळे ,सौ.रोहिणी लोखंडे,सौ. सुनीता नाईक, ,सौ.अश्विनी धुमाळे, सौ.पूजा शेगांवकर, सौ.रेखा कलशेट्टी सौ.रागिणी लोखंडे सौ.वैशाली देशमाने, सौ. ज्योति फेसगाळे, सौ.उषा टाकणे, सौ.ज्योती गंगणे,सौ. दिपाली नवगिरे यांनी कार्यक्रम पार पाडला . याप्रसंगी समाजातील सर्व महिला आपल्या लहान मुला बाळा सहित उत्साहाने उपस्थित होत्या. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी वीरशैव तेली समाज लातूर अध्यक्ष,जेष्ठ सल्लागार,सर्व संचालक मंडळ यांनी महत्वाचे योगदान दिले.