नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 1) - मोहन देशमाने
संत तुकारामांनी अभंगात ठणकावून सांगितले. मी कोण आहे तर एक शुद्र घरात जन्म घेतलेला एक साधा माणुस आहे. वेद, स्मृती, ब्राह्मण्य, उपनिषदे पाहु शकत नाही तिथे वाचणे दुरच. त्याचा अभ्यासकरुन मांडणे त्या ही पेक्षा दूर आहे. आणी असा मी जरूर असलो तरी तुमच्या शास्त्रमताला झिडकारून सांगतो. की मी कोण आहे तर मी देव निर्माण करणारे म्हणुन जे सांगतात त्यांचे आम्ही बाप आहोत. आसे व्यवस्थेला सुरूंग लावुन उध्वस्त करणारे विचार जपणारे, संभाळणारे व शेकडो वर्षा करिता ठेवणारे महा मानव संताजी, संताजींच्या नावाने संघटना, संताजीचे पुजन करून सभा, बेठका, भाषण बाजी, व जेवणावळी संपन्न होतात. फॉर्म पासून उद्घटना पर्यंत संताजीला समोर ठेऊन वधुवर मेळाव्याचा स्मार्ट समाज उत्सव साजरा करतो. फक्त पुण्य स्मरणा आगोदर व पुण्यतिथी दिवशी जयजयकार. सोबतीला ब्राह्मण किंवा न मिळाल्यास त्या वळचनी खालचा एखाद्या किर्तनकार बोलावून भंडारा नावाचा कायर्र्क्रम संपन्न करतो. किती सोपी व सुटसुटीत समाज सेवा. इथे कुठेच संघर्ष नसतो. असेलच तर तो समाज पातळीवर या बाबत आम्ही सर्वजन (अपवाद सोडुन) यात वाकबगार आहोत. हे नेहमी मी मांडतो आणी हे मांडतो म्हणुन धमकीचे फोन, समज देण्याचे फोन. कधी कधी आपल्या घरात. आपल्या गावात बोलावून जे खरे आहे ते आमचेच आहे. असे न म्हणता माझेच खरे इतकी समाज सेवेची पातळी गाठलेले भेटतात. पुन्हा जय संताजी म्हणतात तेंव्हा संताजीचा फोटो कदाचित अधीक हिरमुसला होत असावा. इतकी शोकांतीका समोर येते.