लातूर: विरशैव तेली समाजाने गेल्या 50 वर्षांपासून जपलेली अखंड परंपरा यावर्षीही महाशिवरात्रीच्या निमित्ताने साजरी करण्यात आली. श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान येथे अमावस्येच्या दिवशी गंगाजल अभिषेक व मानाची काठी लावून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजाचे अध्यक्ष श्री किशोर भुजबळ यांच्या हस्ते मानाच्या काठीचे पूजन करण्यात आले. सोबत गुरूकृपा भजनी मंडळ मंदिर कमिटीचे विश्वस्त श्री सुरेश गोजमगुंडे यांनी काठीचे पुजन करून स्वागत केले
या कार्यक्रमात समाजातील अनेक गण्यमान्य व्यक्ती उपस्थित होत्या. युवराज लोखंडे, शिवराज लोखंडे, इंद्रजित राऊत, क्षीरसागर उमाकांत, अजय कलशेट्टी, हरनाळे सर सुदर्शन क्षीरसागर संजय उदगीरे, रामलिंग काळे, हनमंत भुजबळ, बाळू चोपडे यांसह समाजाचे ज्येष्ठ आधारस्तंभ श्री मन्मथ आप्पा लोखंडे, श्री भिमाशंकर देशमाने, नागनाथ भुजबळ, श्री शिवाजी खडके, श्री सुभाष राऊत, श्री बाबुराव व्यव्हारे, श्री सोमनाथ खडके यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. समाजातील सर्व बंधुभगिनी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उत्सवादरम्यान समाजाच्या एकात्मतेचे व परंपरेचे महत्त्व पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले. विरशैव तेली समाजाच्या या परंपरेचे रक्षण व पालन करण्यासाठी समाजातील सर्वांनी एकजूट दर्शविली. या कार्यक्रमातून समाजाच्या संस्कृतीचा व परंपरेचा गौरव साजरा करण्यात आला.