छत्रपती संभाजीनगर तेली समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा रविवारी मातोश्री लॉनवर स्व. देवीदास बाबुराव साबणे नगरी येथे उत्साहात संपन्न झाला. खा. संदीपान भुमरे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे होते.
काळानुसार आपणही आधुनिकतेची कास धरायला हवी. पारंपरिक व्यवसाय करत असताना काळानुसार इतर व्यवसायही करावे, आपल्या मुला- मुलींना उच्च शिक्षण द्यावे, असा हितोपदेश क्षीरसागर यांनी यावेळी केला. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा तेली समाजाचा हा २३ वा वधू-वर पालक परिचय व सामुदायिक मोफत विवाह सोहळा होता. यावेळी ९४० वधू-वर नोंदणी झाली. ज्या वधू-वरांनी व्यासपीठावर येऊन परिचय दिला. त्यांचा प्रत्येकी ३ वर व वधू लकी ड्रॉ काढून बक्षिसे देण्यात आली.
समाजातील विविध क्षेत्रातील ५१ मान्यवरांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आयोजन समितीचे अध्यक्ष भगवान मिटकर यांनी प्रास्ताविक केले. संयोजक कचरू वेळंजकर यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष सुरेश कर्डिले यांनी सूत्रसंचालन केले. धनश्री आंबेकर, राजेंद्र ठोंबरे, अतुल चव्हाण, भगवान राऊत, मनोहर सिनगारे, मनोज सन्तांसे, रमेश बागले, कृष्णा ठोंबरे, संदीप साबणे, विलास खंडागळे, दीपक राऊत, योगेश मिसाळ, भारत कसबेकर, बी. के. चौधरी, भारत चौधरी, राम गोलार, रमेश क्षीरसागर, सुनील लोखंडे, राजेश शिंदे, साई शेलार, अशोक चौधरी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश मिटकर, विष्णू शिदलंबे, भगवान गायकवाड, कपिल राऊत, नारायण दळवी, अशोक शिंदे, अशोक राऊत, रमेश उचित, भिकन राऊत, ज्ञानेश्वर लुटे, भगवान व्यवहारे आदींनी परिश्रम घेतले.