पुणे, दि. १४ – श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड ही संस्था गेल्या १७ वर्षांपासून तेली समाज वधू-वर मेळाव्याचे आयोजन करत आहे. समाजहिताचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रज्ञान शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यांनी सांगितले की, "सध्या अशा वधू-वर पालक मेळाव्यांची समाजाला खूप गरज आहे. अशा मेळाव्यांद्वारे समाजातील युवक-युवतींच्या लग्नासाठी योग्य संधी निर्माण होतात आणि समाजाची एकात्मता सुदृढ होते." हे उद्गार त्यांनी कोथरूड येथील आशीष गार्डन बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या तेली समाजाच्या भव्य राज्यस्तरीय वधू - वर परिचय मेळाव्यात व्यक्त केले. या मेळाव्यात महाराष्ट्राच्या विविध भागातून सुमारे ७५० इच्छुक वधू-वर पालक उपस्थित होते, असे संस्थेचे अध्यक्ष रमेश भोज यांनी सांगितले.
या प्रसंगी सुटुंबरे संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, डॉ. राजेंद्र मिटकर, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, अश्विनी जाधव, राजाभाऊ बराटे, संदीप बुटाला यांसह अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या. मेळाव्याचे अध्यक्षपद दिलीप शिंदे यांनी भूषविले, तर स्वागताध्यक्ष गणेश चव्हाण आणि प्रितम केदारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी एका पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सायली वाळुंजकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री संताजी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष राजेंद्र किरवे, सचिव पंडित चौधरी, खजिनदार सूर्यकांत मेढेकर, सहसचिव शंकर पवार, सहखजिनदार मधुकर गुलवाडे, उपाध्यक्ष किरण किरवे, चंद्रकांत जगनाडे, विश्वस्त वासुदेव गुलवाडे, विठ्ठल किरवे, भगवान खंदारे, रवि उबाळे, कमलाकर करपे, संतोष किरवे, दिलीप कटके, विनोद क्षीरसागर, गणेश अवसरे, महिला अध्यक्षा सुनंदा जाधव आणि सुरेखा देशमाने यांनी मोलाची कामगिरी बजावली.
या मेळाव्याद्वारे समाजातील युवक-युवतींच्या लग्नासाठी योग्य जोडीदार शोधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य झाले. श्री संताजी प्रतिष्ठानच्या या समाजहितकारी कार्याचे सर्वांनी कौतुक केले.