नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 2) - मोहन देशमाने
तेली समाजाच्या आघाडीच्या मासीकात परवा एक लेख वाचला तेंव्हा मला जानेवारी 2014 मधील प्रसंग आठवला. तो प्रसंग घडला तेंव्हाच सांगीतले विचार दडपू नका कारण हे बुमर्यांग तुम्हाला ही दडपुन टाकेल. रहाता जि. नगर येथे श्री संत संताजी पुण्यतीथी होती. जिल्हा पातळी वरील नेते हजर होते. ही घटना घडण्यापुर्वीची समाज अवस्था पाहू विकासाचा महापुरूष म्हणून त्यावेळचे गुजराथचे मुख्यमंंत्री मा. नरेंद्र मोदी भावी पंतप्रधान म्हणून समोर होते. ते जन्माने तेली आहेत. आणी याच वेळी भाजपाने त्या त्या जातीतले नेते निवडून त्या जाती आपल्या पंखा खाली घेण्यास महा रस्ता निर्माण केला होता. त्यातील एक भाग म्हणून मोदींंचे एक भाऊ महाराष्ट्राच्या संपर्कात आले. समाजकारण की राजकारण यात अडकलेल्या हायकमांडच्या संपर्कात होते. यातूनच समाज संघटनेचा पाठींबा जाहीर केला होता. आणी कानात वारे शिरलेले लगेच तयार झाले. आणी संताजींनी केलेली ब्राह्मणी प्रणाली व क्षत्रीय जातींची प्रणाली माती मोल कशी केली. या विचार प्रणालीची पस्तके विक्रीस होती. हा पुस्तकांचा स्टॉल उधळून विक्रता असलेल्या समाज बांधवाला दमदाटी दिली गेली. त्या काळात एका जेष्ठ पत्रकारणे मोदीच का हा लेख प्रसिद्ध का करीत नाही असा सवाल आम्हाला उभा केला. मोदींच्या तेली जन्माला काल आज व उद्या ही माझा विरोधी नाही. विरोध आहे ही सुरू झालेली विचारांची दडपशाही या असहिष्णु पणाला समाजाचे हाय कमांड म्हणुन वेगवेगळ्या समाजात आसतात. हे हायकमांड म्हणजे पुर्वी जात पंचायती होती. त्यांचे कार्यक्षेत्र हे फक्त समाजात संकरीत पणा घडू नये. समाजाचा संस्कृतीचा ठेवा जपला जावा. यासाठी जात पंचायत होती. यांचा निर्णय हा बंधनकारक आसे आणी जो निर्णय बदलेल त्याच्या चौकटीला उलटी चप्पल बांधून बहिष्कृत पणा देत आसत. कालांतराने या सर्व गोष्टीला दडपशाहीचे स्वरूप आले. आणी ही जातपंचायत बदनाम होऊन फेकुन दिली. या पंचायतीचे स्वरूप जाऊन आज नवे कमांड उदयास आले. हे कमांड प्रत्येक वेग वेगळ्या जात समुहात उदयास आले आहे. मुळात हे हाय कमांड प्रत्येक जातीत असावे त्या शिवाय जातीचा विकास होऊ शकणार नाही. हे हाय कमांड जीतके जागृत तेवढी ती जात जागृत राहतो. तेवढा त्या जातीचा सर्वांगीन विकास होतो हे वास्तव कै. गोपीनाथ मुंडे यांनी सिद्ध केले आहे. दलित बांधव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माझा बाप म्हणुन संबोधतात. विठ्ठलाच्या समतेची पताका घेऊन बर्याच संतानी समता स्वातंत्र्य बंधुभाव या साठी दडपशाही बरोबर दोन हात केले म्हणुन आपन त्यांना प्रसंगी आई म्हणून ही आरे तुरे म्हणतो. कारण या सामाजाच्या हाय कमांडानी समता, बंधु भाव, मानवी हाक्क मागीतले, दडपशाहीच्या उरावर ते नाचले परंतु आपण लोकशाहीच्या निवडणुक दरम्यान समता, बंधुभाव व स्वातंत्र्य याला दडपशाहीने संपवीण्याची पाऊल वाट निर्माण केली का ? हा प्रश्न या ठिकाणी माझा आहे.