दिनांक २२ मार्च २०२५ रोजी यवतमाळ ते नेर रोडवरील ढुमनापूर येथे संताजी बी सी ग्रुपची सोडत आणि विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात संताजी सृष्टीसाठी खाणगाव व तळेगाव ग्रामपंचायतींनी ७ हेक्टर ३० आर जागेसाठी एन.ओ.सी. प्रदान केली. या योगदानाबद्दल ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रमुख उपस्थिती सदर कार्यक्रमाचे आयोजन संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (रजिस्टर नंबर ३९८, मेन रोड, नेहरू चौक, यवतमाळ) यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा.आमदार बाळासाहेब मांगूळकर, संतोष भाऊ ढवळे, तळेगाव येथील सरपंच आशिष मोरघडे, भिकूजी कैकाडे, अविनाशजी राजगुरे, संभाजी जिपकाटे आणि अध्यक्ष देवरावजी जिपकाटे उपस्थित होते. तसेच, पी.एच.डी.प्राप्त स्नेहल बनारसे (पुणे) या मान्यवरांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शाही स्नान आणि समाज बांधवांचा सन्मान प्रयागराज येथे शाही स्नान करून आलेल्या अविनाश राजगुरे, किशोर भाऊ थोटे, मालिकार्जून इंगळे यांचा सप्तनिक शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यासोबतच, संताजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मा.बाळासाहेब मांगूळकर यांचाही सत्कार करण्यात आला.
बी सी ग्रुपची सोडत आणि भाग्यवंत विजेते सदर कार्यक्रमात संताजी बी सी ग्रुपची सोडत मान्यवरांच्या हस्ते पार पडली, ज्यामध्ये खालील भाग्यवंत विजेते ठरले:
ग्रुप १: ₹१,००,००० विजेते - शिवम ज्वेलर्स संचालक रत्नाकर पजगाडे
ग्रुप २: ₹९५,००० विजेते - गुलाबराव भोळे
ग्रुप ३: ₹१०,१५,००० विजेते - अशोकराव गुजरकर
या सोडतीला शेकडो समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे कर्मचारी आणि बी सी ग्रुप सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना शेरजे (वासेकर) यांनी केले, तर प्रास्ताविक विलास काळे आणि ज्ञानेश्वर रायमल यांनी केले. सुनील भाऊ महिंद्रे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची माहिती दिली.
कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांसाठी सुरुची पुरणपोळीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. अशा प्रकारे, हा कार्यक्रम आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.