राष्ट्रीय तेली समाज महासंघाने ऑल इंडिया तैलिक साहू महासभा, नवी दिल्लीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी नवीन सभासद नोंदणीची मोहीम हाती घेतली आहे. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जयदत्त अण्णा क्षीरसागर (बीड) यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम देशभरात राबविली जात आहे. या अंतर्गत यवतमाळ येथे 25 फेब्रुवारी 2025 रोजी संताजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर एन. रायमल आणि सचिव विलास काळे यांनी आजीवन सभासद नोंदणी मोहिमेची सुरुवात केली.
या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, 3 मार्च 2025 रोजी यवतमाळच्या दारव्हा रोड येथील राऊत नगरमधील सेवानिवृत्त अभियंता राजेश अमृतराव महिंद्रे, शिंचन नगर येथील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी वसंतराव ढोरे आणि दाते कॉलेज चौक, गिलानी नगर येथील संताजी बी.सी. ग्रुपचे सदस्य अनिल भाऊ जिपकाटे यांनी राष्ट्रीय कृत बँकेच्या धनादेशाद्वारे आजीवन सभासद नोंदणी पूर्ण केली. त्यानंतर आज, 26 मार्च 2025 रोजी दिग्रस येथील मार्गदर्शक श्याम पाटील महिंद्रे आणि शंकरराव भगत सर यांनीही आजीवन सभासदत्व स्वीकारले आणि आपले सभासद फॉर्म ज्ञानेश्वर रायमल यांच्याकडे सुपूर्द केले.
या संघटनेच्या माध्यमातून दर पाच वर्षांनी ऑल इंडिया अधिवेशनाचे आयोजन केले जाते. आतापर्यंत बीड, गोवा, उज्जैन आणि कोलकत्ता येथे अधिवेशने यशस्वीपणे पार पडली आहेत. या अधिवेशनांना उपस्थित राहिलेल्या प्रसिद्धी प्रमुख सुनील भाऊ महिंद्रे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात आजपर्यंत 5,000 हून अधिक आजीवन सभासद नोंदणीकृत झाले आहेत. या सभासदांना मतदानाचा अधिकार असून, दर पाच वर्षांनी गुप्त मतदान पद्धतीने नवीन अध्यक्षाची निवड केली जाते.
ज्या व्यक्तींना स्वेच्छेने आजीवन सभासदत्व घ्यायचे आहे, त्यांनी 2,100 रुपये धनादेश, आधार कार्ड आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो घेऊन 9421774017 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सुनील भाऊ महिंद्रे यांनी केले आहे. ही मोहीम तेली समाजाला एकसंघ आणि सशक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.