नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 3) - मोहन देशमाने
आंबेडकर विद्यापीठाचे शिल्पकार, स्त्रि मुक्तीचे शिल्पकार, ओबीसींचे शिल्पकार म्हणुन पवारांना किती ही मोठे केले. त्यांच्या बरोबर परिषदेमधील समता किती ही जवळ गेली तरी. त्यांचे मराठा पण हे कधीच झाकोळले नव्हते. आणी झाकोळले जात नाही. कारण या सर्व त्यांच्या पाऊल वाटा आहेत. मराठा बाणा ही त्यांची द्रुतगती आहे. या बाबत विचार मांडत असताना पवारांच्या मागे धावणारे त्यावेळी महामेळावे भरवत होते. त्यांना पवारा विरोधात साधा ब्र ही सहन होत नव्हता. पण जेंव्हा समाजाचे म्होरके घरात बसले तेंव्हा कुठे यांना जाग आली. जागे झालेली ही मंडळी नवा आधार स्तंभ शोधत होते. आम्ही 12 टक्के आहोत मागुन देत नसाल तर आम्ही हिसकावून घेऊ अशी गर्जना समाज पातळीवर करीत होते. आपली डरकाळी आपलेच समाज बांधव एैकून घेत आहेत याची काळजी घेऊन टाळ्या घेत होते. याच दरम्यान गुजराथ मधुन मोदींचे भाऊ महाराष्ट्रात आले. आणी तेली समाजाच्या नेत्यांना हायसे वाटले. ते हे विसरले कॉग्रेस प्रणाली म्हणजे क्षत्रिय (मराठा) प्रणाली भाजपा म्हणजे सनातनी ब्राह्मण प्रणाली. ब्राह्मण म्हणजे हिंदू आणि हिंदू धर्म म्हणजे काय हे सर्व बाजुला ठेवून आपण पहिले की या देशावर समाजीक, राजकीय, संस्कृतीक, धार्मीक हुकमत गाजवणारे इतिहासत तेली होते. (हे स्पष्ट संशोधन डॉ. महेंद्र धावडे यांनी केलेले आहे.) या तेल्यांना दडपून टाकून त्यांचा सास्कृतीक, सामाजीक, राजकीय नायनाट करून ब्राह्मण हे हिंदू धमार्र्चे म्होरके झाले. आपण हिंदू आहोत आपल्या सामाजीक विकासाला मंडल आयोग ही सुवर्ण संधी होती. आयोगाला कोर्टात रोखणारे कोण होते. ? मंडलचे आंदोलन तिव्र होण्याच्या काळात ओबीसींच्या डोक्यात रामाचे आंदोलन निर्माण करणारे कोण होत? हे प्रश्न आमच्या नेत्यांना का पडले नाहीत ? या मुळे ते मिळाले ते 12 टक्के ही मिळाले नाही. या देशाचा 45 टक्के हिंदू असलेला ओबीसी हाक्क विकास या पासून दुर ठेवणारे कोण होते ? याची जाणीव समाजाच्या नेत्यांना नसल्या कारणाने मराठ्यांची दावण तोंडण्यात फार मोठा पराक्रम गाजवला या गुर्मीत समाजाला ब्राह्मण्यांच्या तिड्यात अडकवणारे आमचे नेत असतील तर आज बैल गेल्यावर झोपा करण्याची तयारी सुरू झाली समजावी.