नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 4) - मोहन देशमाने
तेली गल्ली मासिक व या मासिकाच्या विचार धारेला बंद पाडा. याचे प्रयोग समाज पातळीवर अनेकांनी करून पाहिले. अगदी जहिराती देऊ नका वर्गणीदार होऊ नका. आसाही प्रचार केला तो खाजगीत व जाहिर सभेत ही झाला. तरी सुद्धा समाजाने आमची भुमीका अभिमाने स्विकारली. हे जेवढे सत्य आहे. तेवढे हे ही एक सत्य आहे की आमची समाजाच्या हित व अहित बाबत खंबीर भुमीके मुळे समाजाचे नेतृत्व सावध होत आहे. सुर्य उगवला पाहिजे तो कोणाच्या डालग्यातील कोंबड्याने बांग दिली ही गोष्टच गौण आहे. काँग्रेसने फसवले भाजपाने ओरबडले ही बाब समाजाला सांगण्याची माणसीकता निर्माण होत आहे. ही तेली गल्ली मासिकाची एैतिहासीक वाटचाल आहे. मागील लेखात मी ओझरते मांडले होते. आम्ही बारा टक्के आहोत आम्ही तुम्हाला सत्ता देऊ शकतो आम्ही तुमची सत्ता हिसकावून घेऊ शकतो. हि ताकद असताना आम्ही मा. मोदी बाबत एक तर्फी प्रेमात फसलो. परवा समाजाचे शिष्टमंडळ त्यांना भेटले पाठपुरावा केला पाहिजे प्रश्न असा आहे मतदान मोदीना व्हावे याचा पाठपुरावा करत आलात. आम्ही सोबत दिली. आज सत्ता मिळताच 12 टक्के समाजाच्या हितासाठी पाठपूरावा करा म्हणुन काही सांगतात. तेंव्हा प्रश्न असा उभा रहातो ती मते तुम्हाला दिली नसती तर सत्तेत बसला आसता का ? याचा पाठपुरावा करावा का ?