नवीन हिंदू वर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वीरशैव तेली समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक स्नेहभेट आयोजित करण्यात आली होती. वीरशैव तेली समाज संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मनमथ आप्पा लोखंडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री भीमाशंकर देशमाने आणि वीरशैव तेली समाजाचे अध्यक्ष श्री किशोर भुजबळ यांनी व्यासपीठावर उपस्थिती दर्शवली.
यावेळी समाजातील ज्येष्ठ संचालक श्री नागनाथअप्पा भुजबळ, श्री दत्तात्रय लोखंडे, श्री शिवाजी खडके यांच्यासह संचालक श्री इंद्रजीत राऊत, श्री सुदर्शन क्षीरसागर, श्री हरनाळे सर, श्री युवराज लोखंडे, श्री संजय उदगिरे, श्री हनुमंत भुजबळ, श्री रामलिंग काळे तसेच युवक प्रतिनिधी श्री बाळू चोपडे आणि श्री गणेश होकळे उपस्थित होते. समाजातील ज्येष्ठ मंडळींनीही या स्नेहभेटीत मोठ्या संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रमात मान्यवरांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा आणि कारभाराचा संपूर्ण अहवाल ज्येष्ठांसमोर सादर केला. तसेच, श्री आकाश निर्मळे यांनी श्री संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी समाजातील सर्व युवकांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. हा कार्यक्रम समाजातील एकता आणि सहकार्याचे प्रतीक ठरला.