राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने स्व. ग. द. आंबेकर पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते दिलीप खोंड यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सचिन भाऊ अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.
दिलीप खोंड यांचा कामगार क्षेत्र लालबाग-परळमध्ये जन्म झाल्यामुळे व राहत असल्यामुळे सामाजिक कार्याची गोडी लागत गेली. झोपडपट्टी ते बिल्डींग राहणीमानात होणारा बदल व संस्कृतीची होणारी जडण-घडण जवळून पाहिली. त्यामुळे सामाजिक कार्याची आवड निर्माण होत गेली. आय. टी. आय. पासून रक्तदान करीत आजमितीस पंच्याहत्तर पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेले आहे. समाजातील मुंबई, सहसचिव, मुख्य सचिव, प्रसिध्दीप्रमुख हया जबाबदाऱ्या सांभाळत आता महाराष्ट्रातील समाजातील अग्रगण्य संस्थेचा मुख्य सचिव म्हणून मागील १२ वर्षे काम पाहत आहेत.
कामगार परिसरात राहत असल्यामुळे तेथील होणाऱ्या बदलाचा अभ्यासपूर्ण सहभागात भाग घेत राहिलो. जसे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजनांद्वारे शैक्षणिक योजना, गंभीर आजार मिळणारा लाभ, त्यांचे विविध उपक्रम व माहिती कंपनीतील कामगारांसाठी स्थानिक लोकांना समाजाला करीत राहिलो. याद्वारे मिळणारे आशिर्वाद व प्रेम याची गणना करू शकत नाही. कंपनीमध्ये कामगार युनियन सहसचिव व सोसायटी संचालक म्हणून सुध्दा सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. या सर्वाचे फलित म्हणून मला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा 'गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार' सन २०१७ रोजी बहाल झाला होता. विविध संस्थावर कार्यरत अशा अनेक सेवाभावी सामाजिक कार्याची दखल राष्ट्रीय मिल मजदूर संघाने नुकताच त्यांना सामाजिक कार्याबद्दल स्व. गं. द. आंबेकर श्रम गौरव पुरस्कार' माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत देऊन केला आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. तरीही त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या कार्याची कोणीतरी दखल घेतली त्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.