शिरपूर - खान्देश तेली समाज मंडळ शिरपूर तालुका कार्यकारणीच्या वतीने शिरपूर तालुक्यातील तेली समाजाची खाणेसुमारी करून त्याची जनसंपर्क पुस्तिका तयार करण्यात आली असून त्या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा रविवार, दिनांक १३ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता संताजी चौक, चौधरी गल्ली, शिरपूर या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमारभाऊ रावल,माजी उद्योगमंत्री जयदत्त क्षीरसागर,भाजपाचे महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष बबनभाऊ चौधरी यांच्या हस्ते पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येईल. यावेळी धुळे शहरातील माजी महापौर सौ.कल्पनाकाकू महाले,जयश्रीताई अहिरराव,प्रतिभाताई चौधरी, छायाताई ईशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन करण्यात येईल.यावेळी श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार शिरीषदादा चौधरी,माजी नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल,धुळे येथील माजी नगरसेवक सुनील काका महाले,संदीपतात्या महाले, सतीशतात्या महाले,युवराज करणकाळ,माजी महापौर भगवान करणकाळ, भाजपाचे संजय गाते,चिंतन भाई पटेल यांच्या हस्ते करण्यात येईल.
खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी व सचिव रवींद्र जयराम चौधरी यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या या जनसंपर्क पुस्तिकेच्या प्रकाश सोहळा प्रसंगी धुळे जिल्ह्यातील आमदार सर्वश्री काशीरामजी पावरा शिरपूर,अनुपभैय्या अग्रवाल धुळे,रामदादा भदाणे धुळे ग्रामीण,आमदार सुरेशमामा भोळे जळगाव,राजेश दादा पाडवी शहादा,अमोल चिमणराव पाटील पारोळा,भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्यामकांत ईशी यांचा प्रमुख सत्कार यावेळी करण्यात येईल.सदर प्रकाशन सोहळा समारंभासाठी माजी खासदार उमेशदादा पाटील, राजगोपाल भंडारी,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे,देवेंद्र पाटील,हर्षवर्धन दहिते,जळगाव जिल्हा शिवसेनाप्रमुख विष्णू भंगाळे,गुरुशिष्य स्मारक समिती धुळे चे अध्यक्ष गुड्डूभाऊ अहिरराव,विक्रांत चांदवडकर नाशिक,भुसावळ येथील अनिल छबीलदास चौधरी,माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे यांच्यासह धुळे,जळगाव,नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील अनेक समाज बांधव,प्रमुख मान्यवर,नगरसेवक,समाज अध्यक्ष,समाजभूषण व्यक्ती उपस्थित राहणार असून शिरपूर शहर व तालुक्यातील सर्व समाज बंधू-भगिनींनी या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने तेली समाज संपर्क पुस्तिका अत्यंत सुबक व आकर्षक अशी बनवण्यात आलेली असून या पुस्तिकेमध्ये कुटुंबप्रमुखाच्या फोटोसहीत कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे,संपर्क क्रमांक,संपूर्ण पत्ता ही संपूर्ण परिचययुक्त पुस्तिका शिरपूर शहर व तालुक्यातील प्रत्येक घरी प्रकाशन समारंभानंतर मोफत वितरित करण्यात येणार आहे.सदर पुस्तिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन शिरपूर तालुका अध्यक्ष दिनेश अशोक चौधरी,सचिव राकेश सुरेश चौधरी,उपाध्यक्ष किशोर देविदास चौधरी यांच्यासह कार्यकारी मंडळ तुषार सुभाष चौधरी,जयेश सुनील चौधरी,कैलास दगडू चौधरी, किशोर संतोष चौधरी,प्रतिक राजेंद्र ईशी,निखील नरेश चौधरी,आकाश राजेंद्र चौधरी,भूपेश वसंत चौधरी, ज्ञानेश्वर ईश्वर चौधरी,महेश नारायण चौधरी,उदय दिलीप चौधरी,निखिल निंबा चौधरी, शेखर हिरालाल चौधरी,योगेश सुरेश चौधरी,प्रितेश संजय चौधरी यांनी केलेले असून प्रकाशन सोहळ्यानंतर सर्व उपस्थिततांसाठी स्नेहभोजनाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे.सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.