नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 5) - मोहन देशमाने
डॉ. बाबासाहेब अंबेडकरांनी घटना लिहीली नसती किंवा ती क्षत्रिय किंवा ब्राह्मण समाजात जन्म घेतलेल्याने लिहिली असती तर समता हा संविधानाचा गाभा राहिला नसता हे वास्तव आपण जेंव्हा सात काळजाच्या कप्यात कोरत नाही. तो पर्यंत असेच घडणार काँग्रेस संस्कृती व भाजपा संस्कृती या दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. यात ओबीसी संस्कृतीचे मालक कोण ही खरी भांडणे आहेत. हे आसे नसते तर घटनेत जे दिले होते ते ओबीसींचे आहे. सांगावयास सन 1978 साल का यावे लागले. 45 टक्के हिंदू आहेत. या आपल्या हिंदू बांधवांचा विकास करणारा मंडल आयोगाला मान्यता सोडाच त्याला विरोध करणारी संघ संस्कृती आज पर्यंत जी यंत्रणा राबवत आहे ती 45 टक्के ओबीसींच्या कल्याणाची आहे का ? आज विचार, आचार स्वातंत्र्य दडपून टाकने म्हणजे देश प्रेम माझ्या विरोधात जो बोलतो तो विचार नष्ट झाला पाहिजे आणी आम्ही म्हणजे अंतिम सत्य ही मांडणी करणे म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होय. डॉ. धावडे यांनी तेली साजाचा इतिहास हा विषय पीएचडी साठी घेतला तेंव्हा संशोधनातुन समोर आले. याच संस्कृतीने तेली समाजाची मुळे उखडून टाकलीत उगवलेले कोंब खुडून टाकलेत. समाजाचा वापर करून समाजाला दिशा हिन करून टाकले आहे. या पुढच्या अनेक पिड्या संदर्भ हिन केल्यात इतिहास पुसून टाकलाय. हे सर्व समन्वयातुन केले.