धुळे - अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय महिला महासचिवपदी धुळ्याच्या माजी महापौर तथा भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. जयश्रीताई कमलाकर अहिरराव यांची नुकतीच निवड करण्यात आली. दिल्ली येथे नुकतीच महासभेची बैठक संपन्न झाली. या बैठकीत त्यांची ही निवड करण्यात आली. बैठकीला अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी नगरविकास मंत्री जयदत्तअण्णा क्षीरसागर, राष्ट्रीय महामंत्री रामलाल गुप्ता, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ. आभा साहू यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल साप्ता.पारोळा भूषणतर्फे अभिनंदन व भावी कार्यासाठी शुभेच्छा.