धुळे- नागपूर येथील दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी अधिवेशनामध्ये जनगणना करण्याचा आग्रह माननीय महसूल मंत्री, तेली समाज ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभेला मार्गदर्शन करतमा निर्देशित केले होते. व त्यानुसार महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष खा. रामदास त, गजानन नाना शेलार तथा महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांनी अपेक्षित असलेला विहित नमुना फॉर्म बावनकुळे यांच्या हस्ते वितरीत केला व त्याच सभेमध्ये सर्वांना जनगणना करण्यासाठी आवाहनही केले. संपूर्ण महाराष्ट्रत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष खा. रामदास तडस, कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, कोषाध्यक्ष गजानन शेलार, राज्य महासचिव डॉ. भूषण कर्डिले, उपाध्यक्ष संजय विभूते, सहसचिव सुनील चौधरी, जयेश बागडे, सेवा आघाडी अध्यक्ष सुभाष पन्हाळे, युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, महिला अध्यक्षा सौ. पुष्पाताई बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे यांची सर्वांना कल्पना आहेच की, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने समाजासाठी सामाजिक दृष्टिकोनातून अनेक समाजहिताची कामे केलेली आहेत. उदा. महाराष्ट्रातील खेडोपाडी तेली समाजाचे राज्यस्तरीय संघटन मजबूत करणे, सुदुंबरे संस्थानाच्या विकासासाठी शासनाशी पत्रव्यवहार करून त्यानुसार निधी मिळवून देणे, संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या नावे पोस्टाचे तिकीट प्रसारित करणे, भयानक कोरोना सुरू असतानादेखील एक महिन्यापेक्षा जास्त दिवस रथयात्रेच्या माध्यमातून समाज जोडो अभियानच्या माध्यमातून संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचे चरित्र, जनगणनाचे महत्त्व व ओबीसी आंदोलनामार्फत ओबीसींची जागरूकता, सुटे तेल या महत्त्वाच्या मुद्यांवर संपूर्ण महाराष्ट्रात आपण तेली बांधव व ओबीसींमध्ये जनजागृती केली होती. मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळी देखील महाराष्ट्र प्रांतिक महासभेने गायकवाड आयोग व बंठीया आयोग यांचे समोर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या अशी स्पष्ट भूमिका प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहून केली होती व त्याबाबत वेळोवेळी हरकतींची लाखो लेखी निवेदने दिली होती. २७% ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यामुळे महाराष्ट्र प्रांतिकतैलिक महासभेने त्याचा सत्यावर उतरून विरोध केला.
दि. २ जुलै २०२१ रोजी ऐन कोरोना काळात राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन केले त्याची दखल राज्य सरकारनेच नव्हे तर देशाच्या लोकसभेमध्ये सुद्धा घेण्यात आली होती. इतकेच नव्हे तर परवा परवा समाजाचा आर्थिक विकास व्हावा याकरिता संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ देखील समाजासाठी शासनाकडे संघर्ष करून मिळवून घेतले आहे. त्याद्वारे आजमितीस फक्त ५० कोटी रुपयाचे अर्थसहाय्य वंचित घटकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे परंतु ५० कोटी ही रक्कम महाराष्ट्रतील आपली एक कोटी पेक्षा जास्त असलेली समाज जनसंख्या यास अपुरी पडणार आहे व हीच बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्याकरिता आपल्याला तातडीने जनगणना करून शासनाला आपली संख्या लेखी स्वरूपात द्यावयाची आहे. जेणेकरून आपल्याला ५० कोटी ऐवजी ५०० कोटी रुपयांचा निधी महामंडळाकरिता मिळवायचा आहे. संपूर्ण राज्यासह धुळे शहर व जिल्हातून लवकरच जनगणनेच्या मोहिमेस सुरुवात होणार आहे तरी आलेल्या स्वयंसेवकास सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, विभागीय अध्यक्ष शशिकांत चौधरी, जिल्हा अध्यक्ष कैलास कालू चौधरी, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ. छाया करनकाळ, विभागीय निरिक्षक तुषार चौधरी, जिल्हा सचिव दिलीप सूर्यवंशी, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष दिनेश बागुल, शहर अध्यक्ष मुकेश थोरात, विलास चौधरी, सेवा आघाडी विभागीय अध्यक्ष डी डी महाले, युवा विभागीय अध्यक्ष संजय चौधरी, सेवा जिल्हा अध्यक्ष सुभाष जाधव, विभागीय उपाध्यक्ष अनिल अहिरराव, डॉ भूषण चौधरी, डॉ गणेश चौधरी, विजय नेरकर सर, युवा विभाग उपाध्यक्ष गणेश चौधरी, सचिव नितीन चौधरी, कल्पेश चौधरी, मनोज भैय्या चौधरी, निलेश माऊली चौधरी, पप्पू अहिरराव, सजन चौधरी, विनोद चौधरी, प्रमोद चौधरी, रमेश कनकाळ, राजेंद्र चौधरी, नटराज चौधरी, मनोहर चौधरी, किरण बागुल, आनंद करनकाळ, भगवान चौधरी, कल्पेश थोरात, महेश चौधरी राजू गणपत चौधरी भानूदास चौधरी, राजेंद्र बागुल, संदीप चौधरी यांच्यासह पदाधिकारींनी केले आहे.