संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, संताजी सृष्टी, भारतीय पिछडा शोषित संघटन ,अखिल तेली समाज महासंघ, एटीएम, ओबीसी जनमोर्चा च्या वतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना माननीय जिल्हाधिकारी महोदय यवतमाळ जिल्हा यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले, महाराष्ट्राचे माजी खासदार माननीय रामदाजी तडस यांना रामनवमीच्या दिवशी राम मंदिरात गर्भगृहामध्ये प्रवेश देण्याच्या संदर्भामध्ये त्यांना नाकारले, ही आधुनिक मनुव्यवस्थेची सुरुवात आहे असे मत डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे यांनी निवेदन देताना व्यक्त केले. त्याचबरोबर देवळी जिल्हा वर्धा येथील पुजारावर कार्यवाही करणेबाबत समाज बांधवांनी निवेदन दिले.
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष, प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष, दोन वेळा आमदार ,दोन वेळा खासदार राहिलेले देवळी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रामदाजी तडस गेली 40 वर्षापासून देवळी, तालुका देवळी ,जिल्हा वर्धा या ठिकाणी असलेल्या पुरातन राम मंदिरामध्ये दर्शन घ्यावयास सपत्नीक गेले असता ,त्यांना त्या ठिकाणी असलेल्या पुजाऱ्याने गर्भगृहामध्ये येण्यास नाकारले ,आणि अतिशय अस्वैधानिक भाषेमध्ये बोलून त्यांचा अपमान केला. भारतीय संविधानाने आम्हाला पूजा ,अर्चा, श्रद्धा, उपासनेचे संरक्षण दिलेले आहे .असे असतानाही एवढ्या मोठ्या खासदार राहिलेल्या व्यक्तीचा अपमान तिथल्या पुजाऱ्यांनी केला. त्या पुजाराच्या विरोधात कार्यवाही करावी आणि आम्हा आक्रोशीत असलेल्या समाज बांधवांना न्याय द्यावा .असे निवेदन मान्य मुख्यमंत्री यांना देण्यात आले. याप्रसंगी संताजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय शैलेश गुल्हाने ,सचिव सुरेश अजमीरे, संताजी सृष्टीचे अध्यक्ष डी एन रायमल ,डॉक्टर विलास काळे, ओबीसी कर्मचारी आघाडीचे शशिकांत लोळगे, जितेंद्र हिंगासपुरे ,गोविंद चव्हाण, दामोदर वसंतराव मोगरकर, तेली समाज विवाह मंडळाचे महेश रामभाऊ ढोले, सचिन वसंता मोहरकर, मधुकरराव पिपराडे, निलेश काळे, अनिल तुकारामजी गुल्हाने ,अरुण कपिले. आधी समाज बांधवांनी निवेदन दिलेले आहे यवतमाळ जिल्ह्याच्या 16 तालुक्यांमध्ये परिवर्तनवादी विचारधारेच्या लोकांना सोबत घेऊन निवेदन देण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे.