लातूर : वीरशैव तेली समाज लातूरच्यावतीने आज श्री महात्मा बसवेश्वर जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने श्री महात्मा बसवेश्वर उद्यानातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास वीरशैव तेली समाजाचे अध्यक्ष किशोर भुजबळ यांच्यासह जेष्ठ संचालक श्री. भिमाशंकर देशमाने, श्री. नगनाथ भुजबळ, सौ. छाया ताई चिंदे, संचालक इंद्रजीत राऊत, युवराज लोखंडे, सुदर्शन क्षीरसागर, रामलिंग काळे, उमाकांत क्षीरसागर तसेच समाजबांधव बाळू चोपडे, शुभम भुजबळ, गणेश होकळे, रामलिंग शेडोळे यांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस समाजप्रमुखांनी महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करताना त्यांचे सामाजिक समतेचे तत्त्वज्ञान आजही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. बसवेश्वरांनी समाजात एकात्मता, समानता आणि कार्यशीलतेचा संदेश दिला असून, त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करणे हे आजच्या पिढीचे कर्तव्य आहे, असे अध्यक्ष किशोर भुजबळ यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
या कार्यक्रमाचे संयोजन समाजातील युवकांनी उत्तम प्रकारे केले होते. वातावरणात भक्तिमयतेसह एकात्मतेचा संदेश रुजवणारा हा कार्यक्रम समाजाच्या एकतेचे प्रतीक ठरला