नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 6) - मोहन देशमाने
पुन्हा एक वेळ विठ्ठलाच्या पयरीवरचा समन्वय मी मांडतोय. या एैतिहासिक ठेवा विसरला म्हणुन आपण जाळ्यात अडकलो डॉ. धावडे यांच्या संशोधना नुसार या देशाच्या कर्ती माणसे बौद्ध धर्माची होती. तेली समता व बंधुभाव घेऊन अनेक देशात गेली. ती समता त्यांनी परक्या देशात पेरली व त्यांनी पेरलेली समता सिलोन तिबेट, ब्रह्मदेशात आज ही सतेज रूपाने आहे. शंकराचार्यंच्या काळात समन्वय झाला आणि या समन्वयातुन काही वर्षात आम्ही सांगतो तोच धर्म. आम्ही सांगतो तेच शास्त्र आम्ही सांगतो तोच देव. आम्ही कोण तर आम्ही देवाचे बाप आहोत. ही गुर्मी आपल्या पुर्वजांचे जीवन माती मोल करणारी विकृतीलाच संस्कृती मानत होतो. तीला पायदळी तुडवताना संत नामदेवांनी विठ्ठल निवडला या वेळी विठ्ठल शिव विचाराचा होता. त्याचे एैतिहासिक पुरावे आज ही पंढरपूर येथे आहेत असे रा. चि. ढेरे पुराव्यानीशी मांउतात. पहिले पंढरपुर महात्म हे तेच सांगते. या दवांची सत्ता संपल्या नंतर ब्राह्मण्य आडगळीत गेले. त्या काळी संत ज्ञानेश्वर हे ठरावीक मंडळी जवळ होते. याच वेळी समाज मनावर संत नामदेवांचे राज्य होते. परंतू या वेळी पंढरपूर ताब्यात घेऊन समन्वय साधुन पंढरपूरचे वैषणवी करण केले. हे जसे केले जात होते. तसे काही ब्राह्मण मंडळी ही मुसलीम प्रशासनाचे घडन कर्ते झाले. राज्य सत्ता व धर्म सत्ता सोबत असताना त्यांनी समनव्य साधता साधता आपली पकड भक्कम केली. तीच गोष्ट संत तुकारामांच्या संत संताजींच्या नंतर. म्हणुनच पेशवाई आवतरली संस्कृतीच्या नावा खाली जो अनैतिकतेचा नंगा नाच माजवला तो त्याचीच प्रतिक्रीया. पेशवाईच्या र्हास नंतर सत्यशोधन करणारे व सामाजीक प्रक्रिया राबवणारे पहिले जगन्नाथ शंकरशेठ होते ते ओबीसी जातीतले सोनार समाजाचे होते. यानंतर अनेक ब्राह्मण सुधारकांनी हिंदू धर्म सुधारण्यासाठी आयुष्य झीजवले हे वास्तव आहे. पण याच वेळी पुन्हा पेशवाई यावी या विचाराची मंडळी धडपडत होती परंतू समाज सुधारकांच्या समोर ही धडपड कुचकामी ठरली व स्वातंच्याची चळवळ प्रत्येका जवळ गेली. या देशातल्या या क्रांतीला प्रतिक्रांती करून परत वेसन घालण्यसाठी 1920 च्या दरम्यान प्रयत्न सुरू झाले. आपल्या हातून सटकलेले 45 टक्के ओबीसी आपल्या मुठीत यावेत याच साठी वेगवेगळ्या पातळीवर लढणार्या या मंडळींनी मुसलीम या नावाचा बागुल बुवा उभा करून कमांड ठेवण्याची धडपड केली. यात मंडल कधी गाडला आपला विकस कधी संपला हा विचार ही येऊ नये इतकी काळजी घेऊन एक ओबीसी या देशाचे पंतप्रधान ही प्रतीकांती केली.