धुळे : केंद्र सरकारने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून, देशात जातनिहाय जनगणना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे खान्देश तेली समाज मंडळ, धुळे शहर यांनी हर्षोल्हासाने स्वागत केले आहे. खान्देश तेली समाज मंडळाच्या शहर कार्यकारिणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत या निर्णयानिमित्त धुळे शहरात जल्लोष साजरा केला. हा जल्लोष राजवाडे बँके जवळील गुरु शिष्य स्मारक परिसरात आयोजित करण्यात आला होता, जिथे समाज बांधवांनी एकत्र येऊन आनंद व्यक्त केला.
जातनिहाय जनगणना व्हावी, ही मागणी ओबीसी समाजाची गेल्या अनेक वर्षांपासूनची होती. या मागणीसाठी देशभरातील अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि संघटनांनी सातत्याने आंदोलने केली होती. खान्देश तेली समाज मंडळाने देखील या मागणीला नेहमीच पाठिंबा देत केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेत समाज मंडळाने ओबीसींच्या हक्कांसाठी आपली भूमिका ठामपणे मांडली. आता केंद्र सरकारने ही मागणी मान्य करत जातनिहाय जनगणनेची घोषणा केल्याने ओबीसी समाजाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. या घोषणेमुळे खान्देश तेली समाज मंडळासह संपूर्ण ओबीसी समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या जल्लोषाच्या कार्यक्रमात धुळे शहराचे लोकप्रिय आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांच्या हस्ते गुरु शिष्य स्मारकातील संताजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर उपस्थित सर्व समाज बांधवांना लाडू वाटप करण्यात आले आणि फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोषाला उत्साहपूर्ण वातावरण प्राप्त झाले. या आनंदोत्सवात सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत हा ऐतिहासिक क्षण साजरा केला.
या प्रसंगी माजी शिक्षण सभापती संदीप तात्या महाले, गुरु शिष्य स्मारक समितीचे अध्यक्ष गुड्डू भाऊ अहिरराव, माजी महापौर कल्पना काकू महाले, जयश्रीताई अहिरराव, प्रतिभाताई चौधरी, नगरसेवक नरेश आप्पा चौधरी, हस्ती बँकेचे संचालक दिलीप आप्पा चौधरी, मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी, बबन बापू थोरात, गिरीश राजाराम चौधरी, सुभाष जाधव, अशोक चौधरी, अरुण बोरसे, राजू शरद चौधरी, शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, अनिल नाना अहिरराव, मनोज मधुकर चौधरी, जयवंत रामदास चौधरी, किरण श्रीराम बागुल, रमेश करणकाळ, भागवत जावरे, मोतीलाल शेठ चौधरी, शिवाजी नाना चौधरी, छोटू श्रावण चौधरी, मांगीलाल चौधरी, प्रमोद धोंडू चौधरी, योगेंद्र नामदेव थोरात, श्रीकांत अहिरराव, सुभाष सोनवणे, सतीश बत्तिसा, विकास चौधरी, जिभाऊ मंगा चौधरी, सागर शिवाजी चौधरी, रितेश दत्तात्रय चौधरी, सनी लक्ष्मण चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हस्ती बँकेच्या संचालकपदी नव्याने नियुक्त झालेल्या दिलीप शंकर चौधरी यांचा आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराने दिलीप चौधरी यांचा उत्साह द्विगुणित झाला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. सर्व समाज बांधवांनी एकमेकांना लाडू भरवून या आनंदोत्सवात सहभाग घेतला आणि या क्षणाला अविस्मरणीय बनवले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खान्देश तेली समाज मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये किशोर पुंडलिक चौधरी, राजेंद्र भाईदास चौधरी, गजानन एकनाथ चौधरी, अमोल हिरामण चौधरी, चंद्रकांत श्रीराम चौधरी, शाम रामदास चौधरी, महेश दौलत चौधरी, अरुण भगवान चौधरी, किशोर हरी चौधरी, मुकेश श्रीराम चौधरी, गजेंद्र फुलचंद चौधरी आणि जगन्नाथ शंकर चौधरी यांचा समावेश होता. या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे हा जल्लोष अत्यंत यशस्वी ठरला आणि खान्देश तेली समाज मंडळासाठी हा एक ऐतिहासिक क्षण बनला.