नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 7) - मोहन देशमाने
मा. मोदी यांच्या तेली प्रेमला माझा ही सलाम आहे. या देशाने पतप्रधान एक तेली बांधव आसणे ही आपना सर्वांची जी अभिमानाची बाब आहे. ती माझी सुद्धा आहे. आपण त्यांना मते दिलीत. अगदी तेली समाजाची आब्रु वेशीवर टांगणार्या भाजपा उमेदवार बाबनराव पाचपुते यांच्या प्रचाराला तेली समाजाचे हाय कमांड जातीने हाजर होते हा वादाचा विषय मी बाजूला ठेवला तरी महत्वाचा प्रश्न संपत नाही उलट प्रश्नांची मालिका सुरू होते. या बद्दल मी आघाडीवर होतो. पण या आघाडीत तेली समाजाच्या मासिकातील सर्वाधीक खपाचे मासिक या सर्व घटना नंतर जेंव्हा सामील होते तेंव्हा काही गोष्टी समोर असणे गरजेचे आहे. पुन्हा एक वेळ मांडतो (काँग्रेस मराठा क्षत्रिय व भाजपा ब्राह्मण जातीचे प्रतिनिधीत्व करतो.) हा या दोन्ही पक्षांचा मुळ गाभा आहे. स्वातंत्र्य मिळवण्याच्या पुर्वी जी सामाजीक राजकीय क्रांती झाली तीच मुळात समता, स्वातंत्र्य या विचारांची. उलट विचाराला दडपून प्रतिक्रांती आज जोमात सुरू आहे. मा. मोदी पंतप्रधान झालेत. त्यांचा जय जयकार करणार्यांना एक प्रश्न विचारतो. मोदी पंतप्रधान होताच ब्राह्मण्य या प्रणालीला मोठी प्रतिष्ठा मिळाली इ. सन. 1200 दरम्यान जी प्रतिष्ठा होती. त्या प्रतिष्ठेकडे ब्राह्मण्य आगेकुच करीत आहे. हे वास्तव रोज पाहतोय कळत असून ही आपन त्याचाच भाग बनतो आहोत, परंतु मा. मोदी तेली आहेत. मा. मोदी ओबीसी आहेत. आपले सामाजीक, राजकीय, सांस्कृतीक, धार्मीक बबत काय प्रतिष्ठा मिळाली? आपले विचार या देश पातळीवर किती उठले गेले ? तेली पंतप्रधान हे ढोल बडवून समाजाची काही काळ करमणुक करून आपली व समाजाची एक वेळ फसवणुक ही मान्य करू. परंतु आपण समनवय साधुन उद्याच्या समाजाला गुलामी देत आहोत याचे भान नसेल तर आपण गुलामीचे निमंत्रक आहोत. हे उद्याचे एैतिहासिक मांडणे गुन्हा नसुन कर्तव्य आहे.