जालना- बॉम्बे फोटो स्टुडिओ चे संचालक प्रेस फोटोग्राफर सामाजिक कार्यकर्ते अतुल (राजु) बाबुराव व्यवहारे यांची तेली सेने च्या जालना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली प्रदेश अध्यक्ष डॉ. विठ्ठल रणबावरे व संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी नियुक्ती केली आहे.
दिलेल्या पत्रात म्हणले आहे की आपण समाजातील सामाजिक भान जोपासणारे व्यक्तिमत्व असून समाजाच्या विविध सामाजिक कार्यामध्ये आपला सक्रिय सहभाग असतो आपण आपले संघटन कौशल्य वापरून तेली समाजाला संघटित करून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा व महाराष्ट्र तेली समाजाचे नेते तथा तेली सेनेचे मुख्य मार्गदर्शक आणि आधारस्तंभ महसूल मंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे हात मजबूत करावे व वरिष्ठांच्या निदर्शित सूचनेचे वेळोवेळी पालन करावे. नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.