नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 8) - मोहन देशमाने
राजेशाही, हुकूमशाही, ब्राह्मण शाही पेक्षा लोकशाही श्रेष्ठ या लोकशाहीत लोकशाहीच्या मार्गाने दबाव गट हा लोकशाही जीवंत ठेवण्याचा हा महत्वाचा भाग हे दबाव गट जीतके जागृत असतात तेवढी लोकशाही बळकट आसते. या दबाव गटाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील महत्त्वांच्या दबावगटाचा आपण विचार करू संसदेत निवडलेल्या सदस्यांना संघटीत समाजाचे नेमके प्रश्न समजण्यासाठी बाहेर जागृती असावी लागते. संघटीत समाजाने आपले प्रश्न मांडून वातावरण निर्माण करून संसद सदस्यांना सभागृहात मांडणी करून प्रश्न सोडवण्यास सहकार्य करावयाचे आसते. हे दबाव गट सत्ताधारी पक्षाचे जसे असावेत तसे विरोधी पक्षाचे ही सुद्धा असावेत. मत देण्या एवढे नव्हे तर त्या पेक्षा जास्त महत्व या दबाव गटाचे आसते आणि ही नेमकी हीच गोष्ट आपल्या नेत्या मंडळींना नाही त्यांना काही ही विचारणे म्हणजे विचारण्याराचा सामाजीक गुन्हा विचारणारा समाजद्रोही आहे. हे ठरवण्याची हायकमांड वृत्ती समाजाला र्हासात घेऊन जात आहे. मा. मोदी तेली आहेत या देशाचे पंतप्रधान तेली आहेत. या पोकळ अभिमानात आपल्या जगण्यातकाही फरक पाडू शकत नाही. ही सत्य घटना या वेळेपर्यंत हाय कमांड पेक्षा समाजाच्या मनात चांगलीच रूजली आहे. वधु-वर मेळावे, चिंतन शिबीर, सभा संम्मेलने यात मोदी प्रेमाची भाषणे ठोकण्या पेक्षा सामाजीक प्रश्न घेऊन हाय कमांड आपला एक दबाव गट निर्माण करून संसदेत आसलेल्या सभासदांना प्रश्न सोडवण्यास लावत नाही ही खरी आमची पोटतिडीक आहे. समाजाला आता तिटकरा आला आहे. तुला मी पद देतो. मीच तुला पद देऊन मोठे केले आहे. याला घरात बसवला. या गावात, या जिल्ह्यात माझा माणूस कसा नेता होईल. यातून समाज विस्कटला तरी चालेल. कधी समजुन कधी न कळत समाज शाब्दीक बाबत दुखवला पणात असेल आपली चुक प्रांजळ पणे कबुल करून मनाचा मोठे पणा न दाखवता. मी राहून समाज एैक्याच्या गप्पा मारणे. तेली तुतुका एक आहे. ही ढोंग बाजू समाज हिताची नाहीच. समाजात आपल्या मोठे पणासाठी दबाव गट निर्माण करण्यापेक्षा मा. मोदी पंतप्रधान आहेत त्यांचा अभिमान असेल. समाजप्रश्ना विषयी ढोंग नसेल तर असा दबाव गट निर्माण करून संसदेत प्रश्न सोडवा. अन्यथा एक तेली, एक ओबीसी पंत प्रधान देशाला मिळुन फक्त ब्राह्मण विचार सरणीचाच उदोउदो होईल आणी पुन्हा शेकडो वर्षा साठी ब्राह्मणांची गुलामगीरी करावी लागेल. म्हणुन कमांड ही गुलामगीरीचे निमंत्रक आहेत हे मांडणे गुन्हा होऊ शकतो का ?