धुळे - खान्देश तेली समाज मंडळाच्या मेळाव्याने संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळविला असून आपल्या मेळाव्याच्या माध्यमातून दरवर्षी अनेक विवाह जुळून खरी समाजसेवा मंडळाचे कार्यकर्ते करत असल्याचे प्रतिपादन माजी महापौर सौ.कल्पना महाले यांनी केले ते खान्देश तेली समाज मंडळ आयोजित वधू वर परिचय मेळाव्याचे फॉर्म प्रकाशन वेळी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
आय.एम.ए.हॉल येथे रविवारी संपन्न झालेल्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर सौ. जयश्रीताई अहिरराव, सौ. प्रतिभाताई चौधरी,सौ.मायाताई चौधरी, प्रदेश कॉग्रेसचे सचिव युवराज करनकाळ,विनोद मंडपचे संचालक विनोद चौधरी,गुरु शिष्य स्मारक समितीचे अध्यक्ष गुड्डूभाऊ अहिरराव, नगरसेवक नरेश आप्पा चौधरी, कृ. उ. बा. अकुवा. चे संचालक दिलीप शंकर चौधरी, तेली समाजाचे सचिव युवराज महादू चौधरी, रामेश्वर धोंडू चौधरी,मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी,सचिव रवींद्र जयराम चौधरी,उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी,धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, मुकटी तेली समाज अध्यक्ष भगवान श्रीधर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत बळीराम चौधरी,अनिल शिवदास अहिरराव, पोपटराव डोंगर चौधरी,सुभाष धर्मा जाधव, प्रमोद धोंडू चौधरी, डॉ.विशाल अशोक चौधरी, महिला मंडळ अध्यक्ष सौ.कविता अहिरराव, सचिव सौ.प्रियंका चौधरी, छोटू चौधरी वलवाडी, छोटू चौधरी कुसुंबा, जळगाव जिल्हा अध्यक्ष सोनू भटू चौधरी,चाळीसगाव अध्यक्ष सुनील भिवसन चौधरी, जळगाव जिल्हा सचिव प्रशांत रामदास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संताजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी माजी महापौर जयश्री अहिरराव यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करून मंडळाला नुकताच महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल अभिनंदन केले.तसेच मेळाव्यात सहभागी होऊन सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन समाजातील सर्व घटकांना केले.मंडळाचे सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी प्रास्ताविक मधून मेळावा विषयी माहिती देऊन समाजाने सहकार्य करावे असे आवाहन केले.यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा मंडळाच्या वतीने,तसेच तेली समाज महिला मंडळ च्या नवीन कार्यकारिणीचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.खान्देशातील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी बांधवांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, उपाध्यक्ष किरण श्रीराम बागुल,धुळे शहर सचिव किशोर पुंडलिक चौधरी,उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीराम चौधरी,खजिनदार राजेंद्र भाईदास चौधरी,उपाध्यक्ष गजानन एकनाथ चौधरी,अमोल हिरामण चौधरी,गजेंद्र फुलचंद चौधरी,अतुल सुरेश चौधरी,मुकेश श्रीराम चौधरी,किशोर हरी चौधरी,भाऊसाहेब चौधरी वरखेडी,चोपडा तालुका अध्यक्ष प्रकाश शंकर चौधरी,सतीश दीपचंद चौधरी चोपडा,प्रदीप लक्ष्मण चौधरी चोपडा,दत्तात्रय चौधरी चाळीसगाव,आर.डी. चौधरी चाळीसगाव,दोंडाईचा अध्यक्ष लालचंद निंबा चौधरी,लोटन भटू चौधरी सोनगीर,चैतन्य मनोज चौधरी अमळनेर,दिपक नवल चौधरी,कमलेश कैलास चौधरी ,अरुण भगवान चौधरी,नितीन मोतीलाल चौधरी,प्रमोद महादू चौधरी,नटराज बाबूलाल चौधरी,रवींद्र वसंत चौधरी,जगन्नाथ शंकर चौधरी,महेश दौलत चौधरी,श्याम रामदास चौधरी,कैलास रतन बोरसे, पंकज संतोष चौधरी कुसुंबा,विजय धनजी चौधरी,जिभाऊ चौधरी आनंदखेडा,राजेश श्रीराम चौधरी, सौ.रंजना मनोज चिलंदे,सौ.वंदना दीपक चौधरी,सौ.सुवर्णा नितीन चौधरी,सौ.रूपाली प्रमोद चौधरी,सौ.ज्योती राजेंद्र चौधरी,ज्योती विनोद चौधरी,सौ.अलका नटराज चौधरी आदींनी परिश्रम घेतले
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन छोटू श्रावण चौधरी कुसुंबा यांनी केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात येऊन सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहार देण्यात आला.