धुळे, २०२५: महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त खान्देश तेली समाज मंडळाच्या धुळे शहर शाखेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या निवडीत राजेंद्र भटू चौधरी यांची अध्यक्षपदी, तर चि. किशोर पुंडलिक चौधरी यांची सचिवपदी निवड झाली आहे. मंडळाचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते कैलास आधार चौधरी (अध्यक्ष), रवींद्र जयराम चौधरी (सचिव), आणि मनोज मधुकर चौधरी (कार्याध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. या कार्यकारिणीच्या माध्यमातून खान्देश तेली समाज मंडळ सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना गती देण्याचा संकल्प करत आहे.
नवीन कार्यकारिणीत कार्याध्यक्ष अमोल हिरामण चौधरी, उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीराम चौधरी, अतुल सुरेश वाघ, गजानन एकनाथ चौधरी, गजेंद्र फुलचंद चौधरी, खजिनदार राजेंद्र भाईदास चौधरी, सहखजिनदार कैलास रतन बोरसे, संपर्क प्रमुख अरुण भगवान चौधरी, श्याम रामदास चौधरी, संघटक महेश दौलत चौधरी, मुकेश श्रीराम चौधरी, किशोर हरी चौधरी, सहसचिव रविंद्र वसंत चौधरी, मुकेश नवल चौधरी, प्रसिद्धी प्रमुख चि. कमलेश कैलास चौधरी, चि. प्रतिक रविंद्र चौधरी, आणि सल्लागार दीपक नवल चौधरी यांचा समावेश आहे. ही निवड समाजातील सक्रिय सहभाग आणि नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली आहे.
या निवडीमुळे धुळे शहरातील तेली समाजात उत्साहाचे वातावरण आहे. माजी नगरसेवक सुनील महाले, माजी शिक्षण सभापती संदीप महाले, माजी नगरसेवक सतीश महाले, नरेश चौधरी, युवराज करणकाळ, गुड्डूभाऊ अहिरराव, दिलीप शंकर चौधरी, शशिकांत चौधरी, अनिलनाना अहिरराव, माजी महापौर सौ. कल्पना महाले, जयश्री अहिरराव, आणि प्रतिभा चौधरी यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे. खान्देश तेली समाज मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक गुणवंत सत्कार, वधू-वर मेळावे, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे समाजाच्या उन्नतीसाठी योगदान दिले आहे. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून समाजाला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. समाज बांधवांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.