रविवार दि. २०.०७.२०२५ रोजी राजगुरूनगर, खेड, पुणे येथे तैलिक महासभा विभागीय पदाधिकारी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीसाठी अखंड ओबीसी बांधवांच्या ऐक्यासाठी तसेच संपूर्ण तेली समाजाच्या उन्नतीसाठी, एकीकरणासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले राज्यस्तरीय शिष्टमंडळ यांनी बैठकीस अनमोल मार्गदर्शन केले.
सभेमध्ये तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष मा. खासदार रामदास तडस, कोषाध्यक्ष मा. श्री. गजानन नाना शेलार, महासचिव मा. डॉ. भूषणजी कर्डिले, राज्याचे सहसचिव श्री. सुनिल चौधरी, सहसचिव श्री. जयेश बागडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे विभागीय अध्यक्ष प्रकाश गिधे होते. सूत्रसंचालन श्री. संजय फल्ले व श्री प्रदीप करपे विभाग सचिव यांनी केले. आपले अत्यंत प्रभावशाली भाषणात श्री. गजानन नाना शेलार यांनी संपूर्ण पुणे विभागातील तेली समाजाला ओबीसी ऐक्य साधण्यासाठी एकरुप होऊन सामाजिक कार्यात उतरून समाजोन्नती करण्याचे आवाहन केले.
महासचिव डॉ. भूषणजी कर्डिले यांनी अतिशय अभ्यासपूर्ण, आवेशपूर्ण भाषणात देशाचे सर्वोच्चपदी विराजमान असणारऱ्या भारताचे पतंप्रधान माननीय श्री. नरेंद्रजी मोदी यांचे आपण समाजबांधव असलेने, प्रांतिक संघटना ही सर्वोच्च राज्यस्तरीय संघटना असून, संघटनेचा येणा-या भविष्यकाळात देशपातळीवरील ओबीसी उन्नतीकरिता महत्त्वाचा वाटा राहणार असून, देशपातळीवरील होणारे जातीय जनगणनेत आपल्या संघटनेचा विशेष सहभाग भविष्यात राहणेसाठी तळागाळातील समाजबांधवांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले.
आज महासभेला राज्य शासनाचे माध्यमातुन राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार श्री. दैवेद्रजी फडणवीस साहेब व नामदार श्री. चंद्रशेखर बावणकुळे साहेब महसूल मंत्री सातत्याने प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करणेकामी मदत करतात. तसेच पुणे विभागातील असणाऱ्या सामाजिक अडीअडचणी सोडविणे कामी लवकरच मंत्रालयीन पातळीवर विशेष बैठक आयोजित करणार असल्याची माहिती दिली. पुणे शहराध्यक्ष गणेश चव्हाण यांनी महासभेच्या माध्यमातून पुणे जिल्हा पातळीवर समाजाच्या उन्नतीकरिता सुरू असलेल्या कामकाजाची माहिती सभेस दिली.
सभेत दिलीपराव शिंदे, सुनील चौधरी, शिवराज शेलार, सौ. अश्विनी चिंचकर, अविनाश कहाणे, सौ. निमलताई घाटकर, बाळासाहेब किरवे, राहुल खळदे, चारुदत्त क्षीरसागर यांची भाषणे झाली.
सभेसाठी पुणे शहर भगत परिवार, तिळवण तेली समाज सर्व विश्वस्त मंडळ, पुणे शहर, उपनगरे, पिंपरी चिंचवड शहर, भोर, वेल्हा, मुळशी, शिरुर, दौंड, इंदापूर, जुन्नर, मावळ, आंबेगाव येथून बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे आयोजन उत्तर पुणे अध्यक्ष अविनाश कहाणे, विभागीय अध्यक्ष प्रकाश गिधे, सर्व खेड येथील सर्व पदाधिकारी, घनश्याम भगत, जीवन येवले, प्रवीण बारमुख, जितेंद्र भगत, खळदकर बंधू यांनी केले. यावेळी उपस्थितांचे प्रदीप करपे विभागीय सचिव यांनी आभार मानले.