महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभा आणि संताजी अखिल तेली समाज संघटना, आर्वी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि नामवंतांचा सत्कार समारंभ आर्वी येथील आशिर्वाद मंगल कार्यालय, जाजुवाडी येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. या समारंभात आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यातील दहावी (90% पेक्षा जास्त) आणि बारावी (80% पेक्षा जास्त) गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच समाजसेवा आणि उद्योग क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी खासदार आणि महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष मा. रामदास तडस यांनी भूषवले. यावेळी नवनिर्वाचित खासदार अमर काळे, माजी खासदार सुरेश वाघमारे, आमदार दादाराव केचे, आमदार सुमित वानखडे, माजी आमदार राजू तिमांडे, माजी नगराध्यक्ष डॉ. वसंत गुल्हाने, प्रशांत सव्वालाखे, तळेकर, माजी सभापती हनुमंत चरडे, मदत फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी, वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राजेश काळबांडे, कारंजा तालुका अध्यक्ष सुनील वंजारी, कोषाध्यक्ष सुदिप भांगे, आष्टी तालुका अध्यक्ष धनराज हिरुडकर, तालुका अध्यक्ष राजकुमार सव्वालाखे, जितेंद्र हिंगासपुरे, किशोर जिरापुरे, आणि अतुल गुल्हाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री. संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नवनिर्वाचित खासदार अमर काळे, आमदार दादाराव केचे आणि आमदार सुमित वानखडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, समाजाच्या उन्नतीसाठी अविरत कार्य करणाऱ्या समाजसेवक जितेंद्र हिंगासपुरे (यवतमाळ), किशोर जिरापुरे (अमरावती), प्रकाश गुल्हाने (आर्वी तालुका कार्याध्यक्ष आणि मुख्य आयोजक), गणेश काळमोरे (आर्वी तालुका अध्यक्ष), ज्ञानेश्वर आसोले (आर्वी तालुका सचिव), अविनाश टाके (संताजी अखिल तेली संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष), आणि श्रीराम ठोंबरे (तारासावंगा) यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या समारंभात 120 गुणवंत विद्यार्थ्यांना (दहावी आणि बारावी) मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. रामदास तडस यांनी आपल्या भाषणात शिक्षण आणि समाजसेवेच्या माध्यमातून तेली समाजाच्या प्रगतीवर जोर देताना, तरुणांनी समाजाच्या उन्नतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. खासदार अमर काळे यांनी विद्यार्थ्यांना मेहनत आणि समर्पणाने यश मिळवण्याचा सल्ला दिला, तर सुरेश वाघमारे यांनी समाजसेवकांच्या योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राजेश काळबांडे यांनी केले, तर सौ. ज्योतीताई अजमिरे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. सौ. स्वातीताई प्रकाश गुल्हाने यांनी मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि उपस्थित समाजबंधवांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष प्रकाश गुल्हाने, उपाध्यक्ष अविनाश टाके, अध्यक्ष गणेश काळमोरे, सचिव ज्ञानेश्वर आसोले, प्रवीण बिजवे, अरुण कहारे, सुरेंद्र गोठाणे, प्रमोद गाठे, विवेक कहारे, सौरभ गुल्हाने, मनोज गुल्हाने, रवी वाघमारे, सुमित बारई आणि इतर समाजबंधवांनी अथक परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी, पालक आणि समाजबंधव-भगिनींमुळे हा समारंभ उत्साहपूर्ण आणि अविस्मरणीय ठरला. अशा उपक्रमांमुळे तेली समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळेल आणि समाजाची प्रगती सतत पुढे जाईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली. शेवटी भोजनानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.