नागपूर - ओबीसी समाज समाजामधील तेली समाज हा एक महत्त्वाचा असून हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विखुरलेला आहे. विदर्भातील गावागावांमध्ये या तेली समाजाची संख्या लक्षणीय असून राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद या तेली समाजाचा मध्ये आहे. विदर्भा मध्ये तेली समाजाची खूप मोठी शक्ती आहे. या समजा मध्ये कष्टकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर असून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तेली सेनेने पुढाकार घेतला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी सरकारी असून या योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी तेली सेनेचे पदाधिकारी हे खऱ्या अर्थाने जनसेवक म्हणून काम करणार असून तेली समाजातील सर्वसामान्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तेली सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी योगदान देत राहावे असे नागपूर येथील आमदार निवास येथे आयोजित करण्यात आलेल्या संवाद बैठकीत तेली सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार म्हणाले.
तेली सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ.विठ्ठल रणबावरे यांनी समाजातील सर्वसामान्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी समाजातील सेवाभावी संस्थांनीही आपापल्या संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी विविध सामाजिक उपक्रमे सातत्याने राबवायला हवेत तसेच त्यांनी तेली सेनेच्या विविध आघाड्यांची माहिती देऊन आपले विचार मांडले.
तेली सेनेचे महाराष्ट्र समन्वयक नरेंद्र तराळे यांनी सांगितले की स्वयंरोजगार व सायबर सिक्युरिटीही आताही काळाची खरी गरज असून महाराष्ट्रात सॉफ्टसेन्स कंपनी नागपूर मध्ये असून तिथे प्रशिक्षणाचीही व्यवस्था आहे समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा या सायबर सिक्युरिटीचे उदघाटन मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या शुभहस्ते झालेलं आहे असेही नरेंद्र तराळे म्हणाले त्यांनी उद्योजक व सायबर आशा विविध सामाजिक विषयांवर विचार व्यक्त करून समाज संघटन मजबुती करणावर मार्गदर्शन केले.
तेली सेनेचे विदर्भ अध्यक्ष महेंद्र करकाडे यांनीही समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या. तेली सेनेचे विदर्भ सचिव संजय देशमुख म्हणाले की संघटन मजबूत असल्यास कोणतेही काम सहजपणे करता येते वर्धा जिल्ह्यामध्ये तेली समाजाची संख्या खूप मोठी असून शासनाच्या योजना समाजासाठी प्रभावीपणे राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तेली सेनेच्या महिला आघाडीच्या विभागीय अध्यक्ष सौ.मंजुषा कारेमारे या सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षाही असून त्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी काम करत असून त्यांनीही महिला,सेवाभावीसंस्थेचे कार्य,समाज संघटन अशा विविध विषयावर चर्चा करून आपले विचार व्यक्त केले. तेली सेनेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अनिल समर्थ यांनी तेली समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करून आपले विचार व्यक्त केले.
तेली सेनेच्या विदर्भ महिला आघाडीच्या सचिव योगिता कळंबे म्हणाल्या की संताजी जगनाडे आर्थिक विकास महामंडळाला शासनाने वाढीव निधी देऊन युवकांना उद्योग धंद्यासाठी मदत करण्याची भूमिका घ्यावी या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजक घडवावे असे विचार त्यांनी मांडले पुढे बोलताना त्या म्हणाल्या की काही दिवसांपूर्वी तेली सेनेने व वैभव पल्समेंट यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावतीमध्ये पंडित दीनदळ उपाध्यक्ष रोजगार मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त तेली समाजाच्या तरुण-तरुणींना प्रमुख्याने प्रधान्य देऊन रोजगार मिळवून देण्यासाठी मोलाचे प्रयत्न करण्यात आले महाराष्ट्र समन्वयक नरेंद्र तराळे यांचेही मार्गदर्शन आमच्यासाठी मोलाचे ठरले. असेही त्यांनी सांगितले.
तेली समाजाची दिशा आणि दशा बदलत्या काळातील तेली समाजाची वाटचाल रूढी परंपरा महिला संघटन व तरुण तरुणींच्या विविध प्रश्नांवर महेंद्र महाकाळ व सौ.लक्षमी महाकाळ यांनी सविस्तर चर्चा करून आपले विचार मांडले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,प्रदेशाध्यक्ष डॉ.विठ्ठल रणबावरे महाराष्ट्र समन्वयक नरेंद्र तराळे,विभागीय अध्यक्ष महेंद्र करकाडे,सचिव विलास बुटले,विदर्भ सचिव संजय देशमुख,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अनिल समर्थ,संघटक अशोक तराळे,वर्धा जिल्हा महिला कार्याध्यक्षा आशा देशमुख,विदर्भ महिला आघाडीच्या विभागीय अध्यक्षा सौ.मंजु कारमोरे,तेली सेना महिला आघाडीच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा सौ.भावना नागोसे,विदर्भ महिला सचिव योगिता कळंबे,अमरावती जिल्हाध्यक्ष विलास शेंडे,अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष अजय देठे,अमरावती महिला जिल्हाध्यक्षा अनिता लांजेवार,अमरावती कार्याध्यक्ष आशिष औतकर,उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र महाकाळ,लक्ष्मी महाकाळ,जगदीश नांदरकर,ज्ञानेश्वर सोनवणे,भगवान राऊत,प्रकाश कर्डिले,अशोक लोखंडे,रत्न चौधरी,ज्ञानेश्वर देशमाने,राजेंद्र धोत्रे,संतोष सोनवणे,सुनिता पवार, प्राची पवार,आदींची उपस्थिती होती.