राजगुरूनगर : श्री संत संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळाकरिता पन्नास कोटींची मंजुरी मिळाली आहे, परंतु ती पुरेशी नसल्याने पाचशे कोटी रुपये तरतूद मिळवण्याकरिता सरकारकडे पाठपुरावा करणार असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांनी येथे केले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पुणे विभागाच्या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रांतिक अध्यक्ष रामदास तडस, पुणे विभागीय अध्यक्ष प्रकाश गीधे, उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा राजगुरुनगर बँकेचे माजी उपाध्यक्ष अविनाश कहाणे, प्रदिप कर्पे, अनिल कहाणे, सुधीर येवले, गजानन शेलार, सुनिल चौधरी, जयेश बागडे, सुभाष पन्हाळे उपस्थित होते.
डॉ. कर्डिले म्हणाले, सुदूंबरे येथील संत संताजी महाराज संस्थानच्या विकासासाठी ७२ कोटींचा निधी सरकारकडून प्राप्त झाला असून पुढील विकासकांमासाठी वाढीव दोनशे कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. संताजी महाराजांवर टपाल तिकीट काढण्यासाठी सरकारकडे प्रयत्न सुरु असून सुदूंबरे हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभेसाठी चंद्रकांत वाव्हळ, विजय शिंदे, वासूदेव करपे, संजय फल्ले, अनिल राऊत, गणेश चव्हाण, राजेश राऊत, उल्हास वालझाडे, राजेश शेजवळ, राहुल खळदे, मदन भिसे, सुभाष शिंदे, दिलीप शिंदे, नामदेव कहाणे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रदीप कर्पे यांनी केले. अनिल कहाणे यांनी आभार मानले.