यवतमाळ : समाजात वावरतांना प्रत्येक नागरिकांची सामाजिक जबाबदारी असते. त्यामुळे समाजातील गुणवंतांचा गौरव होणे आवश्यक आहे. यशाला कोणताही शॉर्टकर्ट नसतो. यशासाठी सातत्यपुर्ण कठोर परिश्रम आवश्यक असते, विद्यार्थ्यांनो, यशाची गगणभरारी घ्या, हे आकाश तुमचेच आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. अनिल चांदेवार यांनी केले. ते सत्यसाई क्रिडारंजन सभागृह, नंदुरकर विद्यालय येथे रविवारी (ता.२७) गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलत होते.
श्री संताजी जगनाडे महाराज चॅरीटेबल ट्रस्ट, संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. यवतमाळ, विदर्भ तेली समाज महासंघ जि. यवतमाळ, अखिल तेली समाज महासंघ, संताजी सृष्टी तर्फे रविवार दि. २७ जुलै रोजी सकाळी १० वा. सत्यसाई क्रिडारंजन सभागृह, नंदुरकर विद्यालय येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रकाश नंदुरकर अध्यक्ष सत्य साई सेवा ट्रस्ट, तर कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. डॉ. अनिल चांदेवार प्राचार्य वाधवानी फार्मसी कॉलेज हे होते.
विषेश अतिथी म्हणून अभिजित वंजारी आमदार पदवीधर मतदार संघ नागपुर विभाग, शेखर सावरबांधे अध्यक्ष जवाहर वसतीगृह सिव्हील लाईन नागपुर, राजेश भगत उपायुक्त म.न.पा., नागपुर, रमेश पिसे अध्यक्ष अखिल तेली समाज महासंघ, निलेश गुल्हाने संत साहित्य अभ्यासक, वर्धा हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी आमदार बाळसाहेब मांगुळकर, संतोषभाऊ ढवळे संपर्क प्रमुख (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट यवतमाळ विधानसभा), विक्रांत शिरभाते कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ, लिलाधरजी वाघमारे (अभियंता) समृध्दी महामार्ग महाराज्य रस्ते विकास मंडळ, प्रा. धनंजय आंबटकर जिल्हाध्यक्ष, विदर्भ तेली समाज महासंघ, डॉ. श्रीकांत पर्बत प्राचार्य अध्यापक पदविधर प्रशिक्षण महाविद्यालय यवतमाळ, सुनिता विलास काळे राष्ट्रीय महीला अध्यक्ष अखिल तेली समाज महासंघ, अनिलभाऊ जिपकाटे जिल्हाध्यक्ष, अखिल तेली समाज महासंघ हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर रायमल, संचालन अर्चना शेरजे तर आभार आशीष साखरकर यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. विलास काळे, ज्ञानेश्वर रायमल यांनी केले. या कार्यक्रमाला भरपावसात असंख्य समाजबांधवांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना ज्ञानेश्वर रायमल म्हणाले की, १९९४ पासून आम्ही गुणवंताच्या सत्कारासह तथा गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो. यात अनेकांची मदत मिळते. शिवाय अनेक गरजु मुलींना दत्तकही घेतले आहे. १९९४ पासून अनेक विद्यार्थी उच्च विद्याविभूषीत होऊन मोठ्या पदावर विराजमान झाले. परंतु, एकानेही सामाजिक जाणीव जपली नसून त्यांनी आजपर्यंत समाजासाठी कोणतीही मदत केली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.