दिनांक :- 24 जानेवारी 2016 रोजी महासैनीक भवन, करंजेनाका, सातारा येथे संपन्न झाला. मा. प्रविण हनुमंत पडगळ पुणे यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. जनार्दन गोपाळराव जगनाडे, अध्यक्ष श्री. संताजी महाराज जगनाडे (तेली संस्था) संदुंबरे व सौ. प्रिया ताई महिंद्रे व श्री प्रकाश महिंद्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. संताजी महाराजांच्या प्रतिमेचे दिपप्रज्वलन करून श्री. मुकेश वाईकर - सौ. वैशाली व सुनिल नामदेव दळवी कोरेगाव जनार्दन जगनाडे आदि मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून वधु-वर मेळाव्यास सुरूवात केली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणुन श्री. जनार्दन जगनाडे यांनी सर्व समाज बांधवाला नविन वर्षे मकर संक्रांत व संताजी महाराज पुण्यतिथी महोत्सव 317 वा प्रजासत्ताक दिन व वधुवर मेळाव्यास शुभेच्छा दिल्या व सर्व बांधवांना हे वर्ष आनंदाचे जावो म्हणुन परमेश्वर चरणी प्रार्थना करून आपल्या मार्गदर्शन पर भाषणास सुरूवात केली प्रथमत: सातारा तेली समाजाने दिलेल्या निमंत्रणाचा स्विकार करून आभार मानले.
सातारा तेली समाज सालाबाद प्रमाणे 15 व्या वर्षी सलग यशस्वी मेळावा संपन्न करित आहे. मेळाव्यातुन देशसेवा व समाजसेवा करण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असल्या बद्दल समाज बांधवांना धन्यवाद दिले. अल्प का होईना पण विखुरलेला तेली समाज या निमित्ताने एकत्र येत आहे. प्रेम निर्माण होते मने जुळतात या निमित्ताने आनंद प्राप्त होतो.
या निमीत्ताने एकोणतीस पोटजाती मेळाव्याच्या रूपाने एकत्र मंचावर येणे हि काळाची गरज निर्माण झाली आहे. या सर्व पोटजातीचा पुर्वांपार व्यवसाय तेल गाळपाचाच मग कशासाठी पोटजातीचा उल्लेख. शेवट सर्वांच्या मुखात संताजी तेली, मन स्वच्छ ठेवा गुणवत्तेला महत्व द्या. काळा गोरा, लहान मोठा, गरिब श्रीमंत ही दरी दुर करा मनाने व प्रेमाने जवळ या तरच तिळगुळाचा गोडवा वधु-वर मेळावा संपन्न होईन जग पुर्वी या डोंगरावरून त्या डोंगरावर पायी जायचे परंतु या युगात रोप - वे वापर करू लागलेत चंद्रावर जाऊ लागलेत विज्ञानास सुधारणा होऊ लागली मग पोट जातीचा अडसर कशासाठी हा आडसर दूर झाला तरच आपण मेळावा यशस्वी केल्याचे सार्थक होईल. डाळिंबावर पडणार्या डागाला तेल्या रोगाचे नामाभिधान दिले. हा समाजावर लावलेला एक कलंक आहे. यासाठी आपण एकी दाखवुन शासनाकडे तक्रारार करणे आवश्यक आहे. समाज जागृती होणे. अपेक्षित आहे असे आपल्या ओघवत्या भाषणात समरोप करताना सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजक सातारा तेली समाज अध्यक्ष श्री. अनिल जगन्नाथ क्षिरसागर वधु-वर मेळाव्याचे अध्यक्ष श्री. जयसिंगराव दळवी सामाजीक कार्यकर्ते दयाराम हाडके, माजी अध्यक्ष सुरेशशेठ किरवे, श्री. राम पडगे, मंगलाताई जाधव, प्रकाश पवार पुणे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास अन्नदाते दानशुर अंजना महादेव दळवी व वधु वर पालक सामाजीक क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.
Satara Teli Samaj Vadhu Var Melava 2016