पनवेल - पनवेल तेली समाज कार्यलयाचा 13 व्या वर्धापनदिन सोहळा व विद्यार्थी गुण गौरव सोहळा तसेच संताजी महाराजांच्या जिवनावर आधारित प्रश्न मंजुशा व बक्षिस 5 वी ते 12 वी ते पदविधर 60% वरील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणुन श्री संताजी महाराज जगनाडे संस्था माजी अध्यक्ष श्री. प्रभाकर शेठ डिंगोरकर व विद्यमान अध्यक्ष श्री. जनार्दन जगनाडे (श्री. संताजी महाराज जगनाडे अध्यक्ष सुदुंबरे) हे प्रमुख पाहुणे म्हणुन व्यासपिठावर उपस्थित होते.
आपल्या भाषणात त्यांनी नववषर्र् 2016 तसेच प्रजासत्ताक दिन, पुण्यतिथी 317 वी कार्यालयाची 13 व्या वर्धापदिनाच्या, मकर संक्रात या जानेवारी महिण्यात आलेल्या सर्व महत्वाच्या दिनांच्या समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
श्री. संत संताजी महाराजांवर आधारीत प्रश्न मंजुषा - विद्यार्थी गुणगौरव व तेली समाज मंदिर या उपक्रमाच्या बद्दल सर्व पनवेल तेली समाजाचे मनापासुन कौतुक केले. संताजींच्या कार्याची नव्या पिढीला प्रेरणा देत आहात या बद्दल समाधान व्यक्त केले.
याच प्रमाणे महाराष्ट्राच्या प्रत्येक तेली बंधु भगिनींना विनंती करतो की तेली समाजाचे एकमेव दैवत असलेल्या श्री. संताजी महाराज समाधी मंदिर व संजिवन समाधी परिसर सुंदर रम्य व हरित बनवणे कामी तन-मन-धनाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तिर्थक्षेत्र हे आकर्षक पर्यटन स्थळ बनावे. यासाठी प्रत्येक समाज बांधवाने एक हजार अथवा कुवती नुसार अधिक निधी देण्याचे आवाहन केले.
यासाठी आपले स्थानिक पातळीवरील मतभेद बाजुला ठेवुन गुण्या गोविंदाने नांदणारा समाज निर्माणकरून आपली एकीची वज्रमुठ बांधावी तसेच सामाजिक - सांस्कृतीक - धार्मीक कार्यात सहभाग घेऊन आदर्श समाजाची निर्मीती करावी समाज माझा मी समाजाचा ही परंपरा प्रत्येकाने मनात रूजवावी तरच विकास शक्य आहे.
वरील कार्यक्रमास उपस्थित पनवेल समाज अध्यक्ष सदाशिव जगनाडे, महिला अध्यक्षा जोतीताई जगनाडे, सचिव अतुल खंडाळकर, सतिश वैरागी व मोठ्या प्रमाणात महिला भागीनी विद्यार्थी व समाज बांधव उपस्थित होते. श्री. जर्नार्दन जगनाडे यांनी कलेल्या मार्गदर्शना मुळे समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला.