महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये मौजे गोगवे तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा येथे पवार वस्तीवर (पाडा) कातकरी समाजाच्या लोकांना कौटुंबिक साहित्याचे वाटप संस्थेमार्फत करण्यात आले.
दिनांक 4- 11 -2025 रोजी श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा महाराष्ट्रच्या वतीने आर्थिक व सामाजिक विकासापासून दूर असलेल्या कातकरी समाजाला कौटुंबिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा समाज गाव वस्ती पासून दूर जंगलामध्ये किंवा नदी काठावरती आपली वस्ती टाकून आपले जीवन कंठत असतो. मासेमारी करणे, जंगलातून मध गोळा करणे किंवा जंगलातील कंदमुळे काढून आपली गुजरात करत असतो. हा समाज खरोखरच सामाजिक विकासापासून कितीतरी दूर आहे. अशा या समाजाला सर्वतोपरी मदतीची गरज असल्याचा अभ्यास करून संस्थेने या लोकांना मदत करण्याचे ठरवले व त्याप्रमाणे दिनांक 4/11/2025 रोजी या वस्तीतल्या जवळपास 50 कुटुंबांना कौटुंबिक साहित्याचे वाटप केले गेले.

यावेळी गोगवे गावचे सरपंच श्री भोसले,अर्बन बँकेचे उपाध्यक्ष माननीय मोटे साहेब, संघटनेचे अध्यक्ष माननीय राम पडघे उपाध्यक्ष विठ्ठलराव शिरसागर जिल्हाध्यक्ष संजय शेडगे महिला अध्यक्ष सुरेखा हडके सौ लता पडगे श्री प्रवीण रोकडे श्री राजेंद्र किरवे अरुण किरवे बबन किरवे मारुती शिरसागर निलेश सपकाळ दिलीप सपकाळ शिवाजीराव गंधाले पोपटराव भोज राजेंद्र हडके, प्रकाश पडगे याशिवाय अनेक समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी गोगवे गावच्या सरपंचानी आपल्या भावना व्यक्त करताना या कामासाठी अत्यंत आनंद व्यक्त केला. आपल्यासारख्या संस्थांची समाजाला नितांत गरज आहे, असे सांगितले. आपणाला मी अशा कामासाठी शुभेच्छा व्यक्त करतो व आमच्या ग्रामपंचायतकडे आपल्या कामाची निश्चितच नोंद करतो. असे मनोगत व्यक्त केले. यावेळी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष माननीय दिलीपराव मोटे साहेब यांनी आवर्जून या कार्यक्रमासाठी वेळ काढला व त्यांनी कातकरी समाज यांना यावेळी मार्गदर्शन केले. संघटनेला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या व असे सामाजिक काम करणाऱ्या संघटनांची नितांत गरज असल्याचे आपले मत व्यक्त केले.

यावेळी कातकरी समाजाच्या वतीने महादेवराव पवार यांनी संघटनेचे धन्यवाद व्यक्त केले व आमचे सारखे समाज विकासापासून दूर असलेले लोकांना आपण जी मदत करत आहात यासाठी मी आपला आभारी आहे व आमचा सर्व समाज आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करत आहे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष राम पडगे म्हणाले ही संस्था मुळातच सामाजिक विकासासाठी असल्याने आम्ही सामाजिक विकासाचे अनेक कार्यक्रम राबवत असतो. यामध्ये आरोग्य शिबिर घेणे, शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे, मतिमंद मुलांना मदत करणे, कर्तृत्वान महिलांचा सत्कार करणे विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणे. समाजातील प्रतिष्ठित लोकांचा सन्मान करणे असे अनेक कार्यक्रम संस्था राबवत असते. भविष्य काळामध्ये ही ग्रामीण भागामध्ये असे अनेक कार्यक्रम घेण्याचा संस्थेचा मनोदय आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade