बुलढाणा - संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती यंदा तेली समाज बुलढाण्यात उत्साहात साजरी करणार आहे. जय संताजी तेली समाज व जय संताजी नवयुवक मंडळ, खळेगांव (ता. लोणार) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत भव्य अभिवादन सोहळा आणि त्यानंतर ३ ते ६ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोहळ्याचे ठिकाण ज्ञानगंगा प्राथमिक आश्रम शाळेजवळ, खळेगांव (ता. लोणार, जि. बुलढाणा) असणार आहे. या प्रसंगी तेली समाजाचे दिग्गज नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
संताजी महाराजांच्या तत्त्वज्ञानाला आणि तेली समाजाच्या एकतेला बळ देणारा हा सोहळा खळेगांवसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील तेली बंधू - भगिनींसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. आयोजकांनी सर्व समाज बंधूंना सपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
जय संताजी महाराज! जय तेली समाज ! ????
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade