धुळे। संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती यंदा ६ ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत धुळे महापालिकेजवळील गुरुशिष्य स्मारक परिसरात भव्यदिव्य स्वरूपात साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर खान्देश तेली समाज मंडळाने महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन परिसराची तात्काळ स्वच्छता व डांबरीकरण करण्याची जोरदार मागणी केली आहे.

मंडळाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्मारक परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे, घाण व कचरा पसरलेला आहे. जयंती उत्सवात हजारो भाविक व समाज बंधू येणार असल्याने अशा दयनीय अवस्थेत कार्यक्रम साजरा करणे अशक्य आहे. त्यामुळे ६ डिसेंबरपूर्वी परिसराची पूर्ण स्वच्छता करावी, खड्डे बुजवावेत आणि संपूर्ण रस्ता डांबरीकरण करावा, जेणेकरून भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही.
निवेदन देताना मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रविंद्र जयराम चौधरी, उत्सव समिती प्रमुख राजेंद्र माधवराव बागुल, विनोद चौधरी, राजेंद्र चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खान्देश तेली समाज मंडळाने महापालिकेकडे केलेली ही मागणी पूर्ण झाल्यास संताजी महाराजांची जयंती यंदा अधिक भव्य आणि सुंदर होईल, अशी भावना समाज बंधूंमध्ये व्यक्त होत आहे.
जय संताजी महाराज! जय तेली समाज! ????
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade