जालना । संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त यंदा जालना शहरात सकल तेली समाजाच्या वतीने सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण दिवस भव्य सामाजिक सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. “नर सेवा ही नारायण सेवा” या भावनेने प्रेरित हा उपक्रम सकल तेली समाज, जय संताजी युवा मंच, सकल तेली महिला मंडळ, श्री पु. रुपचंद उस्ताद आखाडा व सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमाने तिळवंत तेली पंचायती वाडा, मोदिखाना, जालना येथे होणार आहे.

दिवसभराचे कार्यक्रम
या सर्व शिबिरांमध्ये गरजू नागरिकांना मोफत उपचार व सुविधा मिळणार आहेत. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र व सन्मान मिळेल.
प्रमुख उपस्थिती व आयोजक
सकल तेली समाज, जालना ने सर्व समाज बंधू-भगिनींना आवाहन केले आहे की, ८ डिसेंबरला मोठ्या संख्येने उपस्थित राहून संताजी महाराजांच्या जयंतीला आणि या सेवाकार्याला यशस्वी करावे.
जय संताजी महाराज! जय तेली समाज! ????
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade