श्री संताजी अखिल तेली समाज संघटन वाडी शाखेद्वारे श्री संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात आली तथा समाजातील वरीष्ठ नेते समाजसेवक, पत्रकार, यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. समाजाचे वरीष्ठ कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री गोविंद रोडे प्रसिद्ध उद्योजक कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते. श्री पुरूषोत्तम लिचडे,श्री प्रशांत बुटले, डॉ देवेंद्र कैकाडे श्री गजानन तलमले,श्री सुभाष खाकसे वरीष्ठ पत्रकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.श्री अनिल बजाईत प्रदेशाध्यक्ष यांनी संघटनेचे प्रास्ताविक सादर केले .संचालन श्री लोकपाल चाफले तथा मार्गदर्शीय भाषण श्री सुभाष खाकसे यांनी केले.उपस्थित मान्यवर पदाधिकारी श्री देवा क्षिरसागर,मोतीराम शहारे उमेश गोमासे ,मनोज भुरे ,रोशन वैदय् ,उमेश साहु यांनी प्रमुख अतिथी यांचे स्वागत केले.श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पगुच्छ पुष्पहार अर्पण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मध्ये वाडी नागपूर उड्डाणपूलाचचे नांव श्री संत जगनाडे महाराज देण्याची 80% प्रक्रिया पुर्ण झाली असताना नांवाची अधिकृत घोषणा का बरं झाली नाही,रविनगर नागपूरच्या पुलांचे नांव घोषीत झाले पण वाडी नागपूर उड्डाणपूलाच्या नांव देण्यास दिरंगाई होत आहे याची खंत तेली समाजात होत आहे. यांचे अनिल बजाईत यांच्या भाषणात पडसाद उमटले. सुभाषजी खाकसे यांनी सांगितले कि संत , महापुरुष हे जाती पुरते मर्यादित न राहता ते सर्व समाजाचे आदर्श असतात , संत जगनाडे महाराज,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सर्व समाजाला घडविण्यासाठी मार्गदर्शक आहे ते प्रत्येक व्यक्तीने अंगिकारायला हवे असे सांगितले.जय सेवा संघटनेचे अरविंद कन्नाचे,श्री राजु शिंदे ,मोहनसिंग दुर्वे यांचे पुष्पगुच्छ देऊन श्री मोतीराम शहारे,अनिल दहाघाणे यांच्या कडुन स्वागत करण्यात आले.उपस्थित पदाधिकारी अनिल बजाईत प्रदेशाध्यक्ष , मोतीराम शहारे,चेतन वरटकर सचिव,अनिल दहाघाणे जिल्हाध्यक्ष, गोविंद रोडे,श्री पुरुषोत्तम लिचडे,दिपक अवचट ,मयांक रागीट , लोकपाल चाफले,पुरुषोत्तम कामडी,देवा क्षिरसागर,देव कामडी,,दिपक अवचट,मनोज भुरे,उमेश गोमासे, रोशन वैद्य,उमेश साहु,सौ वैशाली दहाघाणे,सौ सुरेखा अवचट,श्रीमती योगिता नवखरे,श्रीमती कान्होपात्रा रोडे,सौ रेखाताई रोडे ,होमराज भुरे मनोज भुरे, भुषण नरखेडकर,रोशन वैद्य,विजय शिदुरकर, प्रभाकर लाखडे,योगेश लांजेवार,शरद पारधी,योगेश शहारे,कमलाकर पाटील,सचिन लिचडे, संदीप साठवणे,संदीप नासरे,प्रविण लिचडे, मंगेश येनूसकर ,प्रदीप लिचडे,किशोर ढगे,बालु गोमासे,धिरज घाटोळे,आशिष लिचडे,विनायक लिचडे, शेषरावजी रागीट,सौ मिरा भुरे,सौ पूष्पा शहारे,सौ नेहा शहारे श्री.मधुकर ईखनकर ,अनिल पुंड तथा अन्य पदाधिकारी मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते.तथा महाप्रसाद तथा बुंदी वाटप करण्यात आला
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade