धाराशिव - धाराशिव येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील संत जगनाडे महाराज चौकात जयंती सोहळा साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरानी यावेळी संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्याचा गौरव केला.

जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संताजींनी केले. संताजी महाराजांनी 'तैलसिंधू' व 'शंकरदीपिका' नावाचे ग्रंथ लिहिले. संताजी महाराजांनी 'तैलसिंधु' नावाच्या ग्रंथात व्यवसायाची माहिती दिलेली आहे. सतत ७५ वर्षेपर्यंत अविरत कार्य करणाऱ्या लढवय्या संताजींना तेली समाज म्हणूनच दैवत मानतो. तेली सम जात एवढा त्यागी, बहादूर, नि:स्वार्थी, जनतेवर निस्सीम प्रेम करणारा आणि तुकारामासारख्या द्रष्ट्या माणसाला सर्व परिस्थितीत साथ देणारे संताजी महाराज तेली समाजात जन्माला आले हे तेली समाजाचे भाग्य असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जनता सहकारी बँकेचे माजी चेरमन विश्वास शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संजय देशमुख, धनंजय शिंगाडे, जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, माजी नगरसेवक सोमनाथ गुरव, अभिजित काकडे, तुषार निंबाळकर लक्ष्मण माने, दाजीअप्पा पवार, तेली समाज संघटनेचे जिल्हा सचिव ड. विशाल साखरे, ड. मंजुषा साखरे, ड. खंडेराव चौरे, आबासाहेब खोत, इंजिनियर गवळी, पंकज पाटील, वैजिनाथ गुळवे, प्रमोद मेंगले, लक्ष्मण निर्मळे, शिवलिंग होनखांबे, चंद्रकांत निर्मळे, पांडूरंग भोसले, विशाल मिश्रा, प्रशांत माळी, विष्णु इंगळे, राम माने यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade