अकोला, दि. ८ : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री. संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त सोमवार दि. ८ डिसेंबर रोजी अकोला येथील शिवाजी नगर स्थित आई तुळजा भवानी मंदिर येथून संताजी महाराज शोभा यात्रेचे आयोजन तेली समाज अकोला जिल्हयाच्या वतीने करण्यात आले होते. सदर शोभा यात्रा ही शिवाजी नगर, जयहिंद चौक, सिटी कोतवाली, चौक, गांधी चौक, खुले नाट्यगृह चौक, मार्गक्रमण करत प्रमिलाताई ओक हॉल येथे यात्रेचा समारोप हा कार्यक्रमाच्या स्वरूपात करण्यात आला. महाआरतीला समाजातील १०१ विवाहीत दाम्प्त्यानी आपला सहभाग नोंदविला होता. सुशोभित पहेराव व भगवे फेटे धारण करून हजारो समाज बांधव सदर शोभायत्रे मध्ये सहभागी झाले होते.

यावेळी तेली समाजातील जेष्ठ नागरिक म्हणुन रामराव बोराखडे तर व्यापारी आघाडीचे रमेश भगत तर प्रशासकीय सेवेकरीता कार्यगौरव पुरस्काराने अनिल जुमळे, पोलीस उपअधिक्षक मनोज केदारे, पोलीस निरीक्षक, सागर गोमासे सहा. उमेश सापधारे या मान्यवरांचा तेली समाजाच्या वतीने समारोपीय कार्यक्रम स्थळी सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमामध्ये गोपाल भिरड, मदन भिरड, सुधाकर झापर्डे, विष्णूपंत मेहरे, रमेश गोतमारे, नरेंद्र भिरड, अरविंद देठे, प्रकाश फाटे, वामनराव चोपडे, अशोक वानखडे, मोहन भिरड, माणिकराव नालट, गणेश रायपुरे, अभय बिजवे, गजानन भिरड, डॉ. अभय बागुल, अॅड. आनंद गोदे, जितेश नालट दिलीप क्षीरसागर यांच्यासह शुभम भिरड, राजकर्ण भिरड, देवेंद्र भिरड, उमेश भिरड, ललित भगत, प्रविण झापर्डे, अतुल राठोड, ज्ञानेश्वर रायपुरे, राजु असलमोल तुषार भिरड, शशि चोपडे, अरविंद भिरड, ठाकुरदास चौधरी, अशोक गोतमारे, अमर भगत, गणेश औतकार, विकास राठोड, सुरेंद्र भिरड, विनोद नालट, दिपक भिरड, राजेश साखरकार, अनिल वानखडे, सागर नायसे, सागर झापर्डे, मनिष थोटांगे, मंगेश ढवळे, अमोल मनसुबे, रवि नालट, मयुर उमाळे, आकाश भिरड, विशाल वाघमारे, आनंद चौधरी, डॉ. राजेंद्र वानखडे, राजेश वानखडे, राजु गोतमारे, गणेश ढवळे, विजय थोटांगे, अनंत साखरकर, तुषार गोतमारे यांच्यासह हजारो समाज बांधव सदर कार्यक्रमामध्ये उपस्थित होते असे एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade