सोनगीर, ता. ८ : धुळे शहरातील खानदेश तेली समाज मंडळातर्फे समाजातील दिव्यांग, विधवा, विधूर, घटस्फोटितांचे विवाह जुळवून भव्य विवाह सोहळा आयोजनाचा आदर्श उपक्रम राबविला जातो. शुक्रवारी (ता. ५) दोन घटस्फोटितांचा भव्य विवाह सोहळा समाजातील दानशूरांच्या सहकार्याने एकवीरादेवी मंदिराजवळ पार पडला. रेशीमगाठी जुळल्याने मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

जळगाव येथील दिवंगत रतिलाल चौधरी यांचे चिरंजीव व भटू चौधरी यांचे भाचे चंद्रकांत आणि धुळ्यातील भगवान दिगंबर चौधरी यांची कन्या मोनिका या घटस्फोटितांचा विवाह खानदेश तेली समाज मंडळाने जुळवून आणला. एवढेच नव्हे, तर एकवीरादेवी मंडळाजवळील संत गाडगेबाबा समाज भवनात आयोजित भव्य सोहळ्यात विवाह लावून दिला. या वेळी खानदेश तेली समाज मंडळाने यापुढे दरवर्षी दिव्यांग, घटस्फोटितांचा सामुदायिक विवाह सोहळा घेण्याचा संकल्प केला. यंदा मात्र एकच विवाह झाला.
विवाह सोहळ्यासाठी विनोद मंडप डेकोरेटर्सचे संचालक विनोद चौधरी, माजी शिक्षण सभापती संदीप महाले, नगरसेवक कैलास चौधरी, भोलाभाऊ सगरे, शशिकांत चौधरी, राजेंद्र बागूल यांनी विशेष सहकार्य केले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर प्रतिभा चौधरी, गिरीश चौधरी, संदीप चौधरी, सुभाष जाधव, पोपटराव चौधरी, विलास चौधरी, अशोक चौधरी, विजय चौधरी, पीतांबर महाले, महिला मंडळाच्या अध्यक्षा कविता अहिरराव, रूपाली महाले उपस्थित होते. तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव रवींद्र चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र चौधरी, सचिव किशोर चौधरी, खजिनदार राजेंद्र चौधरी, किरण बागूल, नितीन चौधरी, नटराज चौधरी, प्रमोद चौधरी, श्याम चौधरी, भाऊसाहेब चौधरी, अमोल चौधरी यांनी संयोजन केले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade