जळगाव - श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळाच्या वतीने यंदाचा राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी अतिशय भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू असून मंडळाने विशेष संताजी मंगल मंडप उभारला आहे. या मंडपाचे व कलशाचे भूमिपूजन सोमवारी (दि. ८ डिसेंबर) जळगावचे ज्येष्ठ समाजसेवक शांताराम चौधरी यांच्या शुभहस्ते पार पडले.

भूमिपूजन सोहळ्याला मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, सचिव अनिल पाटील, कार्याध्यक्ष विनोद चौधरी, सीताराम देवरे, बी. एम. चौधरी, डॉ. अर्जुन चौधरी, अनिल चौधरी, संजय चौधरी, मधुकर देवरे, आनंदा चौधरी, दशरथ चौधरी, सचिन चौधरी, व्ही. आर. पाटील, जे. बी. चौधरी, अशोक चौधरी, संजय चौधरी, सुभाष चौधरी, नामदेव चौधरी, अर्जुन चौधरी, सुरेश चौधरी, मेघश्याम चौधरी, राहुल चौधरी, दीपक चौधरी, भानुदास चौधरी, दिलीप चौधरी, मांगो चौधरी, नीलेश चौधरी, सुरेश चौधरी, प्रशांत चौधरी, मयूर ठाकरे, विनोद चौधरी, योगराज चौधरी, कैलास चौधरी, भगवान चौधरी, जितेंद्र चौधरी, किरण चौधरी, लोकेश चौधरी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा मेळावा तेली समाजातील अविवाहित युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळ हे परिचय मेळावे यशस्वीपणे आयोजित करीत आहे आणि यातून शेकडो जोडपी जुळली आहेत. यंदाही राज्यभरातून सुमारे हजारो कुटुंबे सहभागी होणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. मंडपाची सजावट, प्रकाशयोजना, बैठी व्यवस्था, मोफत नाश्ता-जेवण अशा सर्व सोयी करण्यात आल्या आहेत.
भूमिपूजन सोहळ्यानंतर मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांनी सांगितले की, “संताजी महाराजांच्या नावाने उभे राहणारे हे मंगल मंडप केवळ विवाहसोहळ्यांचेच नव्हे तर समाजाच्या सर्व सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे केंद्रबिंदू बनेल. १४ डिसेंबरचा मेळावा ऐतिहासिक करूया, असे आवाहन त्यांनी केले.”
मंडळाने सर्व समाज बांधवांना १४ डिसेंबरला सपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
जय संताजी महाराज ! जय तेली समाज !
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade