सुदुंबरे (ता. मावळ, जि. पुणे)। संत तुकाराम महाराजांचे प्रिय शिष्य, अभंग गाथेचे रक्षक आणि तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी यंदा श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे यांच्या वतीने अतिशय भक्तिमय व भव्यदिव्य स्वरूपात साजरी होणार आहे. मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी (गुरुवार, ११ डिसेंबर ते गुरुवार, १८ डिसेंबर २०२५) या आठ दिवसांच्या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

दररोज सकाळी ४.३० वाजता काकड आरती, त्यानंतर सकाळी ९ ते ११ वाजता महापूजा व अभिषेक, दुपारी १२ ते ३ वाजता तुकाराम गाथा पारायण, संध्याकाळी ४ ते ८ वाजता प्रवचन व रात्री ९ नंतर भजन-कीर्तन व जागर असे कार्यक्रम होतील. दररोज हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
संस्थेच्या वतीने सर्व विभागातील तेली समाज बांधव, श्रीक्षेत्र सुदुंबरे व सुदवडी ग्रामस्थांना सपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयोजकांनी सर्व भाविकांना विनंती केली आहे की, संताजी महाराजांच्या पुण्यतिथीला उपस्थित राहून अखंड हरिनाम सप्ताहाला यशस्वी करावे.
सुदुंबरे हे संताजी महाराजांचे समाधीस्थळ असल्याने दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. यंदा आठ दिवस चालणारा हा सोहळा विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
जय संताजी महाराज! जय तेली समाज!
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade