नांदेड - तेली समाज शैक्षणिक संस्था, नांदेडच्या वतीने यंदाचा राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. मेळाव्याचे ठिकाण वामनराव पावडे मंगल कार्यालय, पुर्णा रोड, नांदेड असणार आहे. मुख्य प्रवर्तक मा. श्री दशरथराव गोविंदराव सावकार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होत आहे.

नोंदणीची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२६ आहे. समाजातील अविवाहित युवक-युवतींच्या पालकांनी लवकरात लवकर फॉर्म भरून सादर करावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मेळाव्यात राज्यभरातून हजारो कुटुंबे सहभागी होणार असल्याने हा सोहळा तेली समाजासाठी वर्षातील सर्वात मोठा वैवाहिक परिचय मेळा ठरणार आहे.

आयोजकांनी सर्व तेली समाज बांधवांना आवाहन केले आहे की, आपल्या मुला-मुलींच्या भविष्यासाठी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. फॉर्म व अधिक माहितीसाठी वर नमूद संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.
जय संताजी महाराज! जय तेली समाज! ????
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade