नागपूर - तेली समाज सांस्कृतिक सेवा मंडळ, श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा (अंबाळा, रामटेक व नागपूर) आणि श्री संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा भव्य वधू-वर व पालक परिचय मेळावा गुरुवार, २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येत आहे. मेळाव्याचे ठिकाण श्री संताजी स्मृती मंदिर, सांस्कृतिक सभागृह, छापरू नगर, गरोबा मैदान, नागपूर - ४४०००८ असणार आहे.

या मेळाव्यात “प्रेमबंधन” नावाच्या वधू-वर परिचय पुस्तिकेचे विशेष विमोचन होईल. “पोटजाती सोडा, समाज जोडा” या प्रेरणादायी संदेशासह हा उपक्रम समाजातील अविवाहित युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. राज्यभरातून हजारो कुटुंबे सहभागी होणार असल्याने हा सोहळा तेली समाजाच्या एकतेचे प्रतीक बनेल.
फॉर्म जमा करण्यासाठी संपर्क
आयोजकांनी सर्व तेली समाज बांधवांना आवाहन केले आहे की, आपल्या मुला-मुलींच्या भविष्यासाठी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि “पोटजाती सोडा, समाज जोडा” या संदेशाला बळ द्यावे.
जय संताजी महाराज! जय तेली समाज! ????
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade