नविन नाशिक तेली समाज संचलित श्री संत जगनाडे महाराज सेवा मंडळ, संताजी युवक मंडळ व संताजी सर्वांगिणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थी गुणगौरव समारंभ व स्नेहभोजनाचा कार्यक्रम शनिवार, दि. २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम भोळे मंगल कार्यालय, उत्तम नगर जवळ, अंबड लिंक रोड, नाशिक येथे संपन्न होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुणवंत व कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा गौरव करून समाजातील शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
कार्यक्रमासाठी मा. शशीकांत मंगरुळे साहेब (उपविभागीय अधिकारी, निफाड), मा. विवेक आर. सोनुने (धर्मदाय सहआयुक्त-१, नाशिक), मा. डॉ. गोविंदराव चौधरी, मा. महेश चौधरी, मा. योगेंद्र चौधरी यांच्यासह प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या प्रसंगी इयत्ता १० वी व १२ वीमध्ये ७५% व त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी, आयटीआय, अभियांत्रिकी, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच क्रीडा, नृत्य, गायन, वकृत्व आदी क्षेत्रात जिल्हा व राज्यस्तरीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
तसेच समाज बांधवांसाठी आजीवन सभासद नोंदणी सुरू असून सभासद शुल्क ₹२५००/- इतके आहे. देणगीदारांना आयकर कायदा ८० जी अंतर्गत सूट मिळणार असल्याची माहितीही मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नाशिक शहर तेली समाज, विविध सामाजिक संस्था, देणगीदार, कार्यकर्ते तसेच महिला मंडळ व युवक मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. समाजातील सर्व बंधु-भगिनींनी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade