शिर्डी (जि. अहिल्यानगर) : शिर्डी येथे आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधू–वर पालक परिचय मेळावा २०२५ अत्यंत उत्साहात आणि हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत पार पडला. हा मेळावा पाचव्या वर्षीही यशस्वी ठरला असून, अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून वधू–वर व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिल्यानगर जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील उच्च शिक्षित वधू–वरांसाठी शिर्डी तेली समाज वधू–वर पालक परिचय मेळावा हा एक प्रभावी व विश्वासार्ह व्यासपीठ ठरत आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गुणवंत युवक–युवतींना योग्य स्थळ मिळण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन ॲड. विक्रांत सिद्धेश्वर वाघचौरे यांनी केले.
शिर्डी वधू–वर मेळावा हा सामाजिक विषमता तसेच श्रीमंत–गरीब असा कोणताही भेदभाव न करता समाजबांधवांना एकत्र आणणारा उपक्रम असून, त्यामुळे दरवर्षी हजारोंच्या संख्येने समाजबांधव आवर्जून उपस्थित राहतात, असेही त्यांनी नमूद केले.
मेळाव्याचे प्रमुख पाहुणे शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष मा. कैलास बापू कोते पाटील होते, तर अध्यक्षस्थानी मा. विजयराव खडांगळे होते. उद्घाटन कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन येवला येथील दत्ता महाले सर यांनी केले, तर आभार प्रा. भारत दिवटे यांनी मानले.
वधू–वर परिचय सत्रात अनेक युवक–युवतींनी मंचावर येऊन आपला सविस्तर परिचय करून दिला व अपेक्षित जीवनसाथीबाबतची माहिती पालकांसमोर मांडली.
लोणी येथील श्री. जगन्नाथशेठ गाडेकर यांनी उपस्थित समाजबांधवांसाठी उत्तम भोजन व्यवस्था उपलब्ध करून दिली.
कार्यक्रमात शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील व बद्रीनाथ लोखंडे यांनी केलेली हृदयस्पर्शी भाषणे उपस्थितांच्या विशेष प्रशंसेस पात्र ठरली.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी बद्रीनाथ लोखंडे, सुधाकर बनसोडे, यशवंतराव वाघचौरे, सचिन लोखंडे, विजय बनसोडे, सागर वाघचौरे, दिलीप चौधरी, दिलीप राऊत व दीपक चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade